नांदेड(प्रतिनिधी)-किनवट पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुटखा प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हा शाखेकडे असतांना कोणाचे आदेश आहेत हे माहित नसतांना गेली 4 वर्ष स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक त्या गुटखा तपासाची सुत्रे हलवत आहेत. मागील चार वर्षांचा अनुभव लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकांनी त्यांना हे अधिकार दिले असावेत अशी चर्चा होत आहे.
काही दिवसांपुर्वी किनवट पोलीस ठाण्यात शेख वसीम शेख रजाक, मुळ रा.हदगाव ह.मु.हिमायतनगर या व्यक्तीच्या ताब्यात गुटखा सापडला. त्या बद्दल किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 272/2024 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेकडे वर्ग केला. अर्थात हा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी करावा असे अपेक्षीत आहे. परंतू दि.23 नोव्हेंबर 2021 ते 22 ऑगस्ट 2021 आणि पुढे दि.23 ऑगस्ट 2021 ते आजपर्यंत तोंडी आदेशामुळे कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण यांच्या हातात या गुटखा तपासाची सुत्रे आहेत. हा तोंडी आदेश कोणाचा हे सुध्दा काही स्पष्ट नाही. गेली चार वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ स्थानिक गुन्हा शाखेत आणि तो सुध्दा तोंडी आदेशाने पुर्ण करणाऱ्या परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाणवर पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी दाखवलेला विश्र्वास प्रशंसनिय आहे. परमेश्र्वर चव्हाण सरकारी वाहनाने किनवटला गेले नसतील तरी किनवट येथील अनेक सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची नोंद झाली आहे.
या प्रकरणातील आरोपीला अटक, त्याची पोलीस कोठडी या सर्व प्रकरणांची हातळणी उदय खंडेराय यांच्यावतीने पोलीस उपनिरिक्षक परमेश्र्वर चव्हाण हे पाहत आहेत. मागच्या चार वर्षात त्यांनी गुटखा, बायो डिझेल, जुगार, जमीन वाद, अर्ज चौकशी या प्रकरणांमध्ये भरपूर उल्लेखनिय कामगिरी केली आहे आणि बहुदा त्यामुळेच उदय खंडेराय सुध्दा त्यांच्यावर खुश झाले असतील आणि आपल्या शाखेत नियुक्ती नसतांना सुध्दा त्यांच्या हातात हा कारभार दिला असेल. असे म्हटले जाते एखाद्या व्यक्तीने केलेल्या मेहनतीला कधी-कधी चांगले तर कधी वाईट फळ सुध्दा येते. ज्याचे नशिबात जे फळ असतील ते त्यांना मिळतील. पोलीस विभागात मात्र ज्यांना खरी गरज आहे, ज्यांच्यात सक्षमता आहे त्यांना वगळून सुध्दा काही जणांच्या नियुक्त्या स्थानिक गुन्हा शाखेत झाल्या आहेत. तसेच ज्यांना खरी अडचण आहेत त्यांच्या मनासारखी नियुक्ती मिळत नाही. पण परमेश्र्वर ठाणुसिंग चव्हाण फक्त तोंडी आदेशाने मागील चार वर्षापासून स्थानिक गुन्हा शाखेत कार्यरत आहेत हा संशोधनाचा विषय असू शकतो.