नांदेड जिल्ह्यात सोमवार ते बुधवार येलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज

नांदेड(प्रतिनिधी)-प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 01:00 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 23 व 25 सप्टेंबर 2024 या दोन दिवसांसाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. व दि. 24 सप्टेंबर 2024 या दिवशी ऑरेंज (Orange) अलर्ट जारी केलेला आहे. 23 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार (Heavy Rainfall 64.5 – 115.5 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार (Heavy to Very Heavy 115.6 – 204.4 mm) पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. आणि दि. 25 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. तरी जनतेने काळजी घ्यावी.       

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!