नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्राील चार जिल्ह्यातील 162 अधिकारी आणि 597 पोलीस अंमलदार अशा 759 लोकांनी मिळून 9 लाख 81 हजार 502 रुपयांची अवैध दारु पकडली आहे. 166 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आणि त्यात 169 आरोपी आहेत.
पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार 21 सप्टेंबर रोजी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांमध्ये अवैध दारु गाळप व विक्री करणाऱ्या ठिकाणावर धाडी टाकून दारु व्यवसायाच्या समुळ उच्चाटनासाठी चारही जिल्ह्यात मासरेडची योजना राबविण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यात 35 लोकांनावर 34 गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून 79 हजार 220 रुपयांची हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु आणि विदेशी दारु जप्त करण्यात आली. नांदेड जिल्ह्याच्या मोहिमेत 38 अधिकारी अणि 145 अंमलदार सहभागी आहेत. परभणी जिल्ह्यात 58 लोकांवर 58 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार 260 रुपयांची हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु आणि विदेशी दारु जप्त करण्यात आली. या मोहिमेत 54 अधिकारी आणि 179 अंमलदारांनी सहभाग घेतला. हिंगोली जिल्ह्यात 26 लोकांवर 24 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांकडून 5 लाख 36 हजार 840 रुपयांची हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु आणि विदेशी दारु जप्त करण्यात आली. या मोहिमेत 39 अधिकारी आणि 130 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला. लातूर जिल्ह्यात 50 लोकांवर 50 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून 1 लाख 84 हजार 885 रुपयांची हातभट्टी दारु, दारुचे रसायन, देशी दारु आणि विदेशी दारु जप्त करण्यात आली.या मोहिमेत 31 अधिकारी आणि 143 पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.
अशा प्रकारे पोलीस परिक्षेत्रात भारी कार्यवाही करण्यात आली. परंतू तीन दिवसांपुर्वीच फेसबुकवर परभणी येथील अयोध्या पौळ पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील एक सत्यता जाहीर करतांना त्यात मटक्याचा आड्याचा व्हिडीओ दाखवला. त्यांच्या या पोस्टवर बरेच कॉमेंटस आहेत. तरीपण त्यांनी न भिता ही पोस्ट केलेली आहे आणि त्यावर अद्याप काही कार्यवाही झाल्याची माहिती समोर आली नाही. अशा प्रकारे लातूर जिल्ह्यात सुध्दा गुटख्याक्याचा मोठा कारभार आहे आणि परभणीच्या नावातच बनी तो बनी नही तो परभणी असे जोडले जाते या एका वाक्यावरून परभणीचा अंदाजपण येतो. नांदेड जिल्ह्यात मात्र अत्यंत कडक पध्दतीने सर्व बंद आहे.