17 वर्षापुर्वी नांदेडमध्ये असलेल्या पोलीस अधिक्षकांचा जन्मदिन यंदाही रक्तदान शिबिराने साजरा झाला

नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल
नांदेड (प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी तथा नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंघल यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जळवपास 125 जणांनी रक्तदान केले. या आयोजनात डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी सन 2007 मध्ये नांदेडचे पोलीस अधिक्षक असतांना भरती केलेल्या पोलीसांचा मोठा सहभाग आहे.
नांदेडमध्ये सन 2007 मध्ये पोलीस अधिक्षक असलेले डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांनी आपल्या नांदेड पोलीस सेवेमध्ये सलग दोन वर्ष पोलीस भरती केली. त्यामध्ये त्यांनी जवळपास 200 पोलीसांना नांदेड जिल्हा पोलीस दलात नियुक्ती दिली. तसेच नांदेडमध्ये त्यांनी केलेल्या कामांची आठवण आजही नागरीक ठेवतात.अनेक जागी त्यांचे नाव निघत असते. दीड दशकापेक्षा जास्तकाळापूर्वी डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे नांदेडमध्ये कार्यरत होते. नागरीकांमध्ये सुध्दा आजही त्यांची के्रज आहे. ते नांदेडमध्ये येतात तेंव्हा त्यांना भेटणाऱ्यांची रिघ लागत असते.
त्यांनी नांदेड सोडल्यानंतर सुध्दा त्यांनी भरती केलेले पोलीस अंमलदार प्रत्येक वर्षी त्यांचा जन्मदिन साजरा करतात. त्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येते. नागरीकांच्यावतीने सुध्दा त्यांच्या जन्मदिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 20 सप्टेेंबर रोजी सन 2007 च्या बॅचमधील पोलीसांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. या रक्तदान शिबिरात जवळपास 125 पोलीसांनी रक्तदान केले. नांदेड पोलीस मित्र परिवार आणि श्री.स्वामी समर्थ ब्लड डोनर यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ.रविंद्रकुमार सिंगल हे नांदेडमध्ये असतांना जनता, कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, इतर कार्यालयांमधील महिला व पुरूष कर्मचारी यांच्यासोबत प्रत्येक रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करत असत. ती आठवण ठेवून रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्यांनी रक्तदान केलेल्या लोकांना लॉटरी पध्दतीने एक सायकल भेट दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस अंमलदार प्रविण अमिलकंठवार, दत्ता गायकवाड, प्रकाश मामुलवार, अनिल मुपडे,आनंद भाडेकर, प्रदीप ऐमेकर यांच्या सह 2007 बॅचच्या सर्व पुरुष आणि महिला अंमलदारांनी परिश्रम घेतले आणि वाढदिवसानिमित्त चे विविध उपक्रम यशस्वी केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!