नांदेड :- खरीप हंगाम 2024 मध्ये शेतकऱ्यांनी शेतात लागवड केलेल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॅपद्वारे शेतकरी स्तरावरुन नोंदविण्यांसाठी यापूर्वीच कळविले होते. परंतु अद्यापपर्यत काही शेतकऱ्यांनी पिकांची नोंद केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी २३ सप्टेंबर 2024 पर्यत ई-पिक नोंदणी करुन घ्यावी. ई-पिक नोंदणीसाठी अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2024 आहे. तरी ज्या् शेतकऱ्यांनी अद्यापपर्यत पिकांची नोंद केलेली नाही त्यांनी शिल्लक शेवटच्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्ण करुन घ्यावी . जेणेकरुन सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
स्नेहनगर पोलीस वसाहतीत जायकवाडी इमारतीचा भाग कोसळला
नांदेड(प्रतिनिधी)-दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खचलेल्या पोलीस इमारतीमध्ये श्रीनगर येथील जायकवाडी इमारतीसमोरचा गॅलरीचा भाग कोसळला…
संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नियोजन करा जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निर्देश
नायगाव, बिलोलीत अधिकाऱ्यांसोबत आढावा गावागावातील जलसंधारणाच्या कामाला गती द्या नांदेड – कालच्या खरीप हंगाम पूर्वतयारी…
“अमृत दुर्गोत्सव 2025”: छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना
नांदेड :- राज्य शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या स्वायत्त संस्थेमार्फत “अमृत…
