नांदेड(प्रतिनिधी)-हनुमान मंदिर देळूप ता.अर्धापूर येथील दानपेटी फोडून चोरट्यांनी 35 हजार रुपये चोरले आहेत. वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन हस्सापूर भागात एका घरात घुसून दोन जणांनी त्या घरातून 16 हजार रुपयांची बळजबरी चोरी केली आहे. हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनता कॉलनी येथे एका घरात लोकांना बंद करून चोरट्यांनी त्या घरातून 1 लाख 15 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शिक्षकाचे दोन अनोळखी व्यक्तीने हल्ला करून 9 हजार 500 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे.
अनिल परसराम बाचेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 सप्टेंबरच्या रात्री 1 वाजेपासून ते 19 सप्टेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान देळूप गावातील हनुमान मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान करून मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी पेटील 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान 25 हजार रुपये आहे. अर्धापूर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 513 प्रमाणे नोंदवला आहे. पोलीस उपनिरिक्षक शेख आयुब अधिक तपास करीत आहेत.
फैसल चाऊस अबुबकर चाऊस यांचे घर हस्सापूर भागातील तहुरा बागेत आहे. 19 सप्टेंबरच्या 4.30 वाजता दोन अनोळखी इसम तोंडाला रुमाल बांधून आले आणि त्यांच्या घराचे दार लाथामारुन तोडले आणि घरात प्रवेश केला. खंजीरने व कोयत्याने उलट्या बाजूने पाठीवर, हाथाच्या दंडावर, कोपऱ्यावर उजव्या पाय्यावर, गुडघ्याजवळ, घोट्याजवळ व उजव्या हातांच्या बोटावर मारहाण करून गंभीर जखमी केले. माझ्या खिशातील 6 हजार रुपये आणि एक 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 16 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 466/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक किरवले हे करणार आहेत.
हिमायतनगर येथील जनता कॉलनीमध्ये राहणारे राहुल उत्तम कावळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.18 सप्टेंबरच्या रात्री 9 ते 19 सप्टेंबरच्या रात्री 2.15 वाजेदरम्यान त्यांच्या घराची कडी कोणी तरी बाहेरून लावली. तेंव्हा त्यांनी या बाबत आपल्या शेजाऱ्याला फोन करून सांगितले. तेंव्हा त्यांच्या शेजाऱ्याने तो कोंडा काढला. तपासणी केली असता घरातील सुटकेसमध्ये ठेवलेले बचत गटाचे 25 हजार रुपये, गल्यातील 15 हजार रुपये, लॉकरमधील 20 हजार रुपये, 4 ग्रॅम सोन्याची अंगठी 25 हजार रुपयांची आणि 5 ग्रॅमची अंगठी 30 हजार रुपयांची असा एकूण 1 लाख 15 हजार 900 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 235/2024 प्रमाणे दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक अजित पाटील हे करीत आहेत.
नारायण धोंडीराम करंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 सप्टेंबरच्या रात्री 9 वाजता ते आणि त्यांची पत्नी आपल्या दुचाकी गाडीवर जात असतांना दुसऱ्या दुचाकीवर 20-25 वयोगटातील दोन युवक आले त्यांनी नारायण करंडेच्या दुचाकीला मागून धका दिला. तेंव्हा ती गाडी बाजूला झाली. तेंव्हा युवकांमधील एकाने त्यांच्या पत्नीच्या हातातील पर्स हिसकावून घेतला आणि त्यातील 8 हजार रुपयांचा मोबाईल, 1500 रुपये रोख असा एकूण 9 हजार 500 रुपयांचा बळजबरीने चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी ही घटना 387/2024 नुसार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार ताटे हे करीत आहेत.