सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या पराभवाचा विधानसभा निवडणुकीत वचपा काढणार – प्रा. राजू सोनसळे

नांदेड (प्रतिनिधि)-विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात सन 1967 मध्ये काँग्रेसने षडयंत्र रचून पराभव केला होता . या पराभवाचा येत्या विधानसभा निवडणुकीत वचपा काढून काँग्रेसला पराभूत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी केले.

 

रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांच्या महावीर नगर पोलीस चौकी लगतच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना प्रा. राजू सोनसळे म्हणाले की,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन परिस्थितीत सांगितले होते की, काँग्रेस हे जळते घर आहे. आज डॉ. बाबासाहेबांच्या या विचाराला 80 वर्षाचा काळ लोटत आला असला तरी अद्यापही काँग्रेसमध्ये कोणताही फरक पडला नाही. सर्वप्रथम काँग्रेसनेच आंबेडकरी चळवळ फोडली, दलित पॅंथर फोडली, आंबेडकरी राजकीय पक्षांची वाताहत करून शकले पाडली. काँग्रेस पक्षाने फोडा आणि झोडा नितीचा अवलंब केल्याने आंबेडकरी चळवळ राजकीय दृष्ट्या क्षीण झाली त्यामुळे ती प्रभावीपणे उभी राहू शकली नाही. सत्तेचा वाटा मिळाल्याशिवाय दलित समाजाचा उद्धार होणार नाही हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ठाम विश्वास काँग्रेसने जाणीवपूर्वक मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली.

अनेकांना राजकारणातून बाहेर पडावे लागले. परंतु यापुढे आता असा प्रकार घडू दिला जाणार नाही. काँग्रेसने आजतागायत षड्यंत्र रचून आंबेडकरी घराण्यातील अनेकांचा नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये जाणीवपूर्वक पराभव करण्याचे पातक काँग्रेस पक्षाने केले आहे . त्यामुळे आता काँग्रेसला आता या पापाची फळ भोगावी लागणार आहेत . यासाठी सरसेनापती इंजिनिअर आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात रिपब्लिकन येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करून त्यांचे पानिपत करेल असा विश्वासही प्रा. सोनसळे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी आता आंबेडकरी जनतेने एकत्र येण्याचे आवाहन केले.

या अभिवादन सभेत माधवदादा जमदाडे, मधुकर झगडे, भारत भालेराव, माधव चिते, राहूल चिखलीकर,यशोनिल मोगले, रुपेश सोनसळे, अमर जोंधळे, मंगेश खंडागळे, महेश पंडित, आदर्श वाघमारे, भैया वाहूळे, सचिन वायवळे, आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!