डॉ . रवींद्र सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त महिला व मुलींसाठी दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

नांदेड -तायक्वादो असोसिएशन ऑफ नांदेड च्या वतीने नांदेड जिल्ह्यासह तायक्वॉदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष राहिलेले नागपूर पोलीस आयुक्त डॉ . रवींद्र कुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त दहा दिवसीय स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन अशोक नगर नांदेड येथे व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी येथे करण्यात आले असून दिनांक 20 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान हे प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे . नांदेड जिल्ह्यासह तायक्वांदो असोसिफशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष पद भूषविताना महिला खेळाडूंसाठी तसेच महिलांना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून विविध शिबिराचे आयोजन डॉ . रविंद्र सिंगल यांच्या अंतर्गत करण्यात आले होते . स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिर राबविण्यात त्यांचे मोठे योगदान लाभले आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त मास्टर तायक्वॉदो मार्शल आर्ट स्कूल अशोक नगर नांदेड येथे सायंकाळी 5 ते 6 च्या दरम्यान व रुद्रा डिफेन्स अकॅडमी विष्णुपुरी नांदेड येथे सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान हे प्रशिक्षण महिला व मुलींना मोफत स्वरूपात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मास्टर बालाजी पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार आहे .इच्छुक महिला व मुलींनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन तायक्वांदो मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या वतीने डॉ . हंसराज वैद्य , सुभाष डाकोरे , फरिद लालामिया , नंदकुमार घोगरे , संजय चव्हाण यांच्या वतीने करण्यात आले आहे . अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 94 20 67 33 94 संपर्क करण्यात यावा अशे आयोजकाच्या वतिने कळविण्यात येत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!