नांदेड(प्रतिनिधी)-गणपती विसर्जनाच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धतींग घालत त्यांच्या गणवेशाची कॉलर पकडणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर बंकटराव कदम यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्री गणेशविसर्जन सुरू असतांना महाविर चौकात रात्री 10.30 वाजेच्यासुमारास श्रीकांत अरुण माने (37) रा.सोमेश कॉलनी नांदेड आणि अनुप मुरलीधर खोवे पाटील (39) रा.विष्णुनगर चौक नांदेड यांनी दारुच्या नशेत आपसात झटापट करून श्री गणेश विसर्जन मिरवणुक रेंगाळत ठेवल्याप्रकरणी पोलीसांनी त्यांनी बाजूला व्हा आणि मिरवणुक पुढे जाऊ द्या असे सांगितले असता त्यांनी मिरवणुक पुढे न नेता पोलीसांसोबतच धतींग केली आणि पोलीसांच्या अंगावर धावून गेले आणि माझे गणवेशातील शर्टचे कॉलर पकडले. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणातील दोन्ही व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 351(2), 3(5) सोबत 110/117 महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि 85(1) महाराष्ट्र दारु बंदी कायदा प्रमाणे गुन्हा क्रमांक 463/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मुपडे यांच्याकडे देण्यात आला आहे.