उद्या 19 सप्टेंबरचा प्रवास जनतेने पर्यायी मार्गाने करावा-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)- उद्या गुरूवार दि. 19 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने निघणाऱ्या मिरवणूकीसंदर्भात पोलीसांनी काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले आहेत आणि पर्यायी मार्ग सुचविले आहेत. जनतेने उद्याचा प्रवास बंद असलेल्या मार्गांबद्दल माहिती घेवून नियोजित करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी केले आहे.
दि.19 सप्टेंबर गुरवार रोजी शहरातून ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने मिरवणुक निघणार आहे. ही मिरवणुक श्रीनगर भागातील निजाम कॉलनी येथून निघतले आणि मोहम्मद अली रोड इतवारा येथे संपते. त्या अनुषंगाने या मिरवणूकीतील लहान, युवक आणि वयस्कर व्यक्ती यांचा सहभाग पाहता. तो मोठा असतो. त्यामुळे काही मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. हा आदेश 19 सप्टेंबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत अंमलात राहिल. या दरम्यान जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी बंद असलेले मार्ग-हबीब टॉकीज-जुना मोंढा-देना बॅंक-महाविर चौक-जिल्हाधिकारी कार्यालय-शिवाजी पुतळा-वजिराबाद चौक-कलामंदिर-शिवाजीनगर-आयटीआय-श्रीनगर-वर्कशॉपकडे जाण्या-येण्यासाठी हा रस्ता पुर्णपणे बंद राहिल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग-जुना मोंढा-वजिराबाद-राज कॉर्नर-कौठा पोलीस चौकी-रविनगर -गोवर्धनघाटपुलकडून शहरात येणारी वाहतुक पोलीस मुख्यालय मार्गे खडकपुरा-लालवाडी अंडर ब्रिज-शिवाजीनगर-पिवळी गिरणी- गणेशनगर वायपॉईंट हा मार्ग जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. वजिराबाद चौकाकडून श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक तिरंगा चौक-पोलीस मुख्यालय मार्गे खडकपुरा-लालवाडी अंडर ब्रिज-शिवाजीनगर-पिवळी गिरणी- गणेशनगर वायपॉईंट हा मार्ग जाण्या-येण्यासाठी सुरू राहिल. राज कॉर्नर ते जुना मोंढा मार्गाकडे जाणारी वाहतुक-राज कॉर्नर-वर्कशॉप कॉर्नर-भाग्यनगर-आनंदनगर-वसंतराव नाईक चौक-महाराणा प्रताप चौक-बाफना या मार्गाने वळविण्यात आली आहे. गांधी पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून श्रीनगरकडे जाणारी वाहतुक-चिखलवाडी कॉर्नर-यात्री निवास पोलीस चौकी-हिंगोली गेट-अण्णाभाऊ साठे चौक मार्गे श्रीनगरकडे जाण्यासाठी वळविण्यात आली आहे. जनतेने उद्याचा प्रवास या बदललेल्या वाहतुक व्यवस्थेला लक्षात ठेवून प्रवास नियोजित करावा असे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!