नांदेड,(प्रतिनिधी)- अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, (Operation flush out) अंतर्गत गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला जास्तीत जास्त अवैध धंद्यावर कारवाया करण्याकरीता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी यांना आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत संबधीत पोलीस ठाणे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया केल्या आहेत. त्यात महाराष्ट्र जुगार कायदा प्रमाणे एकुण सहा ठिकाणी छापे मारून 4,53,740/-रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोठे शिवाजीनगर-2,
भाग्यनगर-1, उमरी-1, मरखेल-1, उस्मानगर-1 याप्रमाणे 06 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तसेच महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा प्रमाणे 14 ठिकाणी छापे मारून कार्यवाही करून 2,93,469/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन यात सुध्दा 22 ईसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण-3. मुखेड-1, तामसा-2, कुंडलवाडी-2, लिंबगाव-1, मुक्रामाबाद-2, धर्माबाद-1, माळाकोळी-2, या प्रमाणे 14 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरच्या कारवाया हया दिनांक 16.09.2024 रोजी गणपती विसर्जनाच्या पुर्वसंध्येला करण्यात आलेल्या आहेत.
सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, डॉ.खंडेराव धरणे, अर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली विविध पोठे प्रभारी यांनी अवैध धंद्यावर छापे मारून कारवाया केल्या आहेत.