नायगाव(प्रतिनिधी)-मौजे मांजरम ता.नायगाव येथील एका शेतातील महादेव मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी अंदाजे 30 हजार रुपयांचा रक्कम चोरून नेली आहे.
सुभाष हवगीराम मंगनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबरच्या रात्री 9 ते 10 सप्टेंबरच्या पहाटे 5 वाजेदरम्यान मांजरम येथील व्यंकटराव शेषराव मंगनाळे यांच्या शेतातील महादेव मंदिरात असलेली दानपेटी कोणी तरी चोरट्यांनी फोडून त्यातील अंदाजे 30 हजार रुपये रक्कम चोरून नेली आहे. नायगाव पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 228/2024 नुसार नोंदवला असून पोलीस उपनिरिक्षक पंडीत अधिक तपास करीत आहेत.