नांदेड – नांदेड जिल्हयातील होमगार्ड अनुशेष पुर्ण करण्यासाठी होमगार्ड नोंदणी 30 ऑगस्ट 2024 पासुन पोलीस मुख्यालय नांदेड येथे सुरू आहे. संगणक प्रणालीमध्ये अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आली आहे. होमगार्ड नोंदणी प्रक्रियेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2024 पर्यंत केले होते. मात्र नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने होमगार्ड नोंदणी प्रक्रियेमध्ये खंड पडून नोंदणी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. ही नोंदणी प्रक्रिया पुन्हा दिनांक 6 ते 10 सप्टेंबर 2024 या दरम्यान राबविण्यात येत आहे.
सदर नोंदणी प्रक्रियेदरम्यान काही उमेदवार काही तांत्रिक कारणाने, वैद्यकीय कारणाने, अतिवृष्टीमुळे किंवा अन्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. अशा सर्व ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये आवेदन सादर केलेल्या उमेदवारांना नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी मिळावी या उद्देशाने दिनांक 9 सप्टेंबर अखेर जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय भाग्यनगर नांदेड येथे किंवा दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी गैरहजर राहण्याच्या सबळ कारणासह अर्ज घेऊन सकाळी 5 वाजता पोलीस मुख्यालय नांदेड येथे हजर राहतील. दिनांक 10 सप्टेंबर रोजी 8 वाजेनंतर अशा कोणत्याही अर्जाचा अथवा उमेदवारांचा विचार का जाणार नाही. या कालावधीनंतर कसल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. अधिक माहितीसाठी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संगणक प्रणालीमध्ये अद्यावत राहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी केले आहे.