बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावरील प्रशिक्षण संपन्न

 नांदेड – प्रत्येक बालकाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. बालकांच्या काळजी व संरक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. या हेतूने नांदेड शहरामध्ये अर्पण फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने दिनांक 4 व 5 सप्टेंबर  या कालावधीत दोन दिवसांचे अनिवासी प्रशिक्षण हॉटेल विसावा पॅलेस नांदेड येथे आयोजित करण्यात आले होते. बाल लैंगिक शोषणावरील मूलभूत समुपदेशन व परिणाम या विषयावर आयोजित दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती जिल्हा ‘महिला व बाल विकास अधिकारी आर.पी. रंगारी यांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करुन करण्यात आले.

आयोजित कार्यक्रमामध्ये 18 वर्षाखालील बालकांच्या सर्वांगीण हित व सुरक्षेच्यादृष्टीने विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला. यामध्ये अर्पण फाऊंडेशनच्यावतीने प्रशिक्षक असलेल्या आरती शिंदे, नेहा व चंद्रीका यांनी बाल लैंगिक शोषणाच्या प्रकारामध्ये सुरक्षित असुरक्षित परिसराबद्दल त्यावर पिडीत बालकास समुपदेशकाने समुपदेशनाच्या माध्यमातून समस्यामुक्त करण्यासाठी वापरावयाचे तंत्र-कौशल्य याबाबत प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना व रन दिल्या.

तसेच प्रशिक्षणास आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थीकडून बालकांच्या संरक्षणाच्यादृष्टीने विविध भूमिका सादरीकरण करुन घेवून खेळी-मेळींच्या वातावरणात प्रशिक्षणार्थीना आकलन होईल, अशा साध्या-सरळ भाषेत बाल लैंगिक शोषणाविषयी जागृत केले. प्रशिक्षणार्थीचा पण उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिसून आला, सदरच्या प्रशिक्षणाचा सर्व प्रशिक्षणार्थीना उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमास महिला राज्य गृहचे अधीक्षक अविनाश खानापूरकर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी विजय नरसीकर,  जिल्हा संरक्षण अधिकारी प्रशांत हनवते यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील अधिकारी-कर्मचारी, सखी वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी, बालगृह, बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या विविध संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बालकांविषयी काम करणाऱ्या अनेक संस्थांचे कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षण कार्यक्रमाचे आभार महिला व बाल विकास विभागाच्यावतीने परिवीक्षा अधिकारी संतोष दरपलवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!