नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील पोलीस उपविभाग इतवारा येथील पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आणि इतवारा पोलीसांचे गुन्हे शोध पथक यांनी ईस्लामपूरा भागात एका घरात छापा मारून 58 हजार 277 रुपयांचा गुटखा पकडला आहे.
9 सप्टेंबर रोजी पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात इतवाराचे पोलीस उपनिरिक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार अर्जुन मुंडे, दासरे, महिला पोलीस अंमलदार कोकणे, हबीब चाऊस, रेवनाथ कोळनुरे आणि जावेद यांनी इस्लामपुरा भागातील मोहम्मद जुबेर अब्दुल खदीर (23) याच्या घरात छापा मारला. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेले वेगेवेगळे अनेक गुटख्याचे पुडे सापडले, सोबतच पान मसाला आणि सुंगंधीत जर्दा सापडला. या सर्व साहित्याची किंमत 58 हजार 277 रुपये आहे. इतवारा पोलीस ठाण्यात मोहम्मद जुबरे अबुद खदीरविरुध्द गुन्हा क्रमांक 242/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक विलास पवार हे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, पोलीस उपअधिक्षकांचे विशेष पथक आणि इतवाराचे गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.