नांदेड- महावितरण मधील लाईन्स स्टाफ कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात यावी या मागणीसाठी 6 सप्टेंबर रोजी ईएलए संघटनेच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर द्वार सभा घेण्यात आली.
नांदेड महावितरण कार्यालयास लाईनमनच्या सुरक्षेच्या विसर पडत असून ही खेदजनक बाब असल्याची खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. संघटनेच्या माध्यमातून याविषयी वारंवार पत्रव्यवहार सुरू आहे. परंतु नांदेड कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केल्याने या निषेधार्थ आज द्वार सभा घेण्यात आली. या द्वार सभेमध्ये संघटनेचे परिमंडळ अध्यक्ष ईश्वरसिंग टेलर, उपाध्यक्ष जाकिर शेख, सचिव मोहनसिंग जांगडे, मंडळ अध्यक्ष कैलास राऊत, दत्ता किशन गुंडेकर, गजानन कुरुडे आदीसह परिमंडळातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.