नांदेड -राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार 9 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7.20 वाजता राज्यराणी एक्सप्रेसने मनमाड येथून नांदेड रेल्वे स्टेशन येथे आगमन. सकाळी 7.40 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथे आगमन व राखीव. सकाळी 9.50 वाजता शासकीय निवासस्थान नांदेड येथून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडकडे प्रयाण. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालस येथून मौजे कासारखेडा, आलेगाव व निळा ता. नांदेडकडे प्रयाण व या गावातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी. दुपारी 12.30 ता. वसमत जि. हिंगोलीकडे प्रयाण करतील.