नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांमध्ये नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. आजच्या परिस्थितीतील अनेक युवकांनी एवढा मोठा पाऊस पाहिलेला नव्हता. विष्णुपूरी धरण 100 टक्के भरलेले होते. त्यातील 18 दरवाजे उघडले होते. त्यामुळे गोदावरी नदीची पातळी सुध्दा 354 झाली होती. पाण्याचे हे विशेष रुप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. पण यातून एक महत्वपुर्ण घटनासमोर आली की, प्रतिबंधीत असलेल्या विष्णुपूरी प्रकल्पात पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि तेथील कर्मचारी जनतेतील काही लोकांना धरण पाहण्यासाठी आत जाऊ देत होते. याचा एक व्हिडीओ ऍड.रामसिंघ मठवाले यांनी घेवून वास्तव न्युज लाईव्हला पाठविला आहे.
4 सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील विष्णुपूरी प्रकल्पाचे 18 दरवाजे उघडण्यात आले होते. या परिस्थितीत पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत होती. विष्णुपूरी गाव, काळेश्र्वर मंदिर, गोदावरी नदीचे काठ या ठिकाणी जनतेची गर्दी झाली होती. असा एवढा पाऊस अनेक वर्षापुर्वीपासून युवकांनी पाहिलेला नव्हता. अनेकांनी विष्णुपूरी प्रकल्प सुध्दा आत जाऊन कधी पाहिलेला नही. बुधार 4 सप्टेंबर रोजी नांदेड येथील ऍड.रामसिंघ मठवाले आणि त्यांचे काही मित्र असर्जन भागात उभे राहुन गोदावरीचा पाट पाहत होते. त्यांना असे दिसले की, विष्णुपूरी प्रकल्पाच्या उघड्या दरवाज्याजवळ सुध्दा काही लोक आहेत. तेंव्हा ते आणि त्यांचे मित्र तेथे गेले. तेथील व्यक्तीला आवाज देवून ते आत जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यासाठी अभियंता अंकुलवार यांची परवागनी घ्यावी लागते असे तेथील सुरक्षा रक्षक म्हणाले. पण ऍड.मठवाले यांनी या ठिकाणची इतर मंडळी कोण आहे याची विचारणा केली असता त्यातील एकाने कर्मचारी आहेत ना असे उत्तर दिले. मठवाले यांनी या प्रकरणाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि सुरक्षा रक्षकाला सांगत होते की, त्यांना जाऊ दिले तर आम्हाला सुध्दा जाऊ द्या. मठवाले यांची रेकॉर्डींग पाहुन एक कुटूंबातील बरेच व्यक्ती तेथून निघून गेले. पण पाच ते सहा युवक हे तेथेच थांबले होते. ती मंडळी निघून गेल्यानंतर सुरक्षा रक्षकाने दाराला कुलूप लावले आणि ऍड.मठवाले यांना प्रवेश नाकारला.
ऍड.मठवाले हे वास्तव न्युज लाईव्हला सांगत होते की, विष्णुपूरी प्रकल्प हे प्रतिबंधीत क्षेत्र आहे. मग मला जाऊ दिले नाही तर इतरांना कसे जावू दिले. सुरक्षा रक्षकाच्या सांगण्याप्रमाणे साहेबांना सांगावे लागते.म्हणजे साहेबांना सांगितले तर प्रतिबंधीत क्षेत्रात सुध्दा जाता येते काय? असा प्रश्न ऍड.मठवाले यांनी उपस्थित केला आहे.
संबंधीत व्हिडीओ…