नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
एमएच-सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड:- एमएच-सीईटी परीक्षा-2024 ही 22 एप्रिल ते 17 मे 2024 (25,26 एप्रिल व 5,6,7,8,12,13,14 मे 2024…
अनोळखी मयत आणि अनोळखी मारेकरी शोधून स्थानिक गुन्हा शाखेची उत्तम कामगिरी
नांदेड(प्रतिनिधी)-बलिप्रतिपदेच्या दिवशी गागलेगाव पाझर तलावाजवळ सापडलेल्या अनोळखी मयत व्यक्तीची ओळख पटवून त्याचा खून कोणी केला.…
पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन
नांदेड(प्रतिनिधी)-28 मे स्वातंत्रविर विनायक दामोधर सावरकर यांचा जन्मदिन. पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्यविर सावरकरांना अभिवादन करण्यात…