नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी 26 ऑगस्ट रोजी तयार झालेल्या आदेशांवर 31 ऑगस्ट रोजी स्वाक्षरी करून नांदेड जिल्ह्यात 8 पोलीस निरिक्षक, 7 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 2 पोलीस उपनिरिक्षक यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत. शहरात वजिराबाद आणि शिवाजीनगर या दोन पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरिक्षक पाठविले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार नांदेड शहरात पोलीस निरिक्षक समाधान किशर चवरे यांना नियंत्रण कक्षातून जिल्हा विशेष शाखेत पाठविले आहे. डायल 112 या विभागातील पोलीस निरिक्षक बबन गंगाराम कऱ्हाळे यांना दुय्यम पोलीस निरिक्षक वजिराबाद येथे पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील पोलीस निरिक्षक शिवाजी दत्तात्रय गुरमे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुय्यम पोलीस निरिक्षक पदावर पाठविले आहे. देगलूर येथील पोलीस निरिक्षक विश्र्वनाथ किशनराव झुंजारे यांना जिल्ह्याची जबाबदारी देत नियंत्रण कक्षात बोलावले आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरिक्षक शामसुंदर मधुकरराव टाक यांना जिल्हा विशेष शाखेतील सुरक्षा विभाग देण्यात आला आहे.पोलीस निरिक्षक अजित पोपट कुंभार हे तोंडी आदेशावर शहर वाहतुक शाखा इतवारा येथे कार्यरत होते त्यांना नायगावला पाठविण्यात आले आहे. नायगावचे पोलीस निरिक्षक मारोती श्रीराम मुंढे यांना दोन राज्याची सिमा सांभाळण्यासाठी देगलूर येथे पाठविण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेतील पोलीस निरिक्षक जगन गणपती पवार यांना शहर वाहतुक शाखा इतवारा येथे पाठविले आहे.
नियंत्रण कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक रमाकांत हनमंतराव नागरगोजे यांना कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी करण्यात आले आहे. कुंडलवाडी येथील दिपक साहेबराव मस्के यांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात बोलावले आहे. नियंत्रण कक्षातील विष्णु यादवराव कऱ्हाळे यांना अर्धापूर येथे पाठविले आहे. कंधार येथील भागवत टिकाराम नागरगोजे यांना कुंडलवाडी येथे पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील विकास भागवत कोकाटे यांना कंधार येथे पाठविले आहे. नियंत्रण कक्षातील महेश ज्ञानेदेव मुळीक यांना इतवारा पोलीस ठाण्यात नियुक्ती दिली आहे. नियंत्रण कक्षातील मंगेश नरसींगराव नाईक यांना भाग्यनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे.
पोलीस उपनिरिक्षक रेणुका बालाजी जाधव नियंत्रण कक्षातून इतवारा दामिनी पथकात जबाबदारी पार पाडणार आहेत. नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक माधव मलगोंडा लोणेकर यांना शहर उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात वाचक पदावर पाठविण्यात आले आहे.