नांदेड(प्रतिनिधी)-आज एका शिकवणी वर्गात शिक्षकाने अल्पवयीन बालिकेसोबत केलेल्या अभद्र व्यवहारासाठी काही युवकांनी शिक्षकाला पकडले. पण शिक्षक पळून गेला युवकांनी शिकवणी वर्गाची काही तोडफोड केली असा प्रकार घडला आहे. वृत्तलिहिपर्यंत या संदर्भाने काही गुन्हा दाखल झाला आहे काय याबद्दलची माहिती प्राप्त झाली नाही.
चैतन्यनगर भागात जिजाई कोचिंग क्लासेस व इंग्लीश स्कुल आहे. काही युवकांना या ठिकाणी जाधव नावाचे शिक्षक अल्पवयीन बालिकेसोबत मागील बऱ्याच काळापासून करत असल्याची माहिती मिळाली. आज युवकांनी हा शिकवणी क्लास गाठला आणि शिक्षकाला पकडले. विचार करत असतांना शिक्षकाने हाताला झटका देवून त्या ठिकाणावरून पळ काढला. त्यानंतर युवकांनी त्या शिकवणी वर्गाची काही तोडफोड केली.
काही काळानंतर हा प्रकार पोलीस ठाण्यात गेला तेथे शिक्षकाला बोलावण्यात आले. परंतू शिकवणी क्लासेसची बदनामी होईल, मुलीची बदनामी होईल अशा शब्दाने हा प्रकार मिटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आपल्याकडे विद्या घेण्यासाठी येणाऱ्या बालिकांसोबत असा प्रकार घडत असेल तर पालकांनी कोणावर विश्र्वास करावा हा प्रश्न या घटनेने समोर आला आहे. भारतात अशा अनेक घटना घडत आहेत. काही दिवसांपुर्वीच शाळेत दोन अल्पवयीन बालिकांसोबत बदलापूर येथे घडला प्रकार भयंकर होता. परंतू त्यानंतर सुध्दा जागृती येत नसेल तर आज समाजात काम करणाऱ्या लोकांची विचारधारा किती वाईट झाली आहे हा भाग नक्कीच विचार करण्यासारखा आहे.