नांदेड: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या मतदार यंत्रांची तपासणी करून ते मतदानासाठी सज्ज करण्यात आले आहेत.
दिनांक 1 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2024 या दरम्यान मतदान यंत्रे तयार करण्याचे कामकाज महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम ,MIDC, ढवळे कॉर्नर नांदेड येथील जिल्हा वेअर हाऊस येथे चालू होते. सदरील कामकाज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी पूर्ण पूर्ण करण्यात आले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने BU 7010, CU 3922, VVPAT 4231 इतके मतदान यंत्रे जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघासाठी तयार करण्यात आली आहेत.
सदरील कामकाज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने व त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडले.त्यामध्ये नायब तहसीलदार भोसीकर मुखेड, नायब तहसीलदार विजयकुमार पोटे, भोकर नायब तहसीलदार सतीश कुलकर्णी, नायगाव नायब तहसीलदार बोलेलो त्याचप्रमाणे इतर विभागाचे 20 ते 25 कर्मचारी व बेल कंपनीचे 16 इंजिनिअर आणि दररोज 30 ते 40 हमाल यांच्या सहकार्याने सदर मतदान यंत्रे तयार करण्याचे एफएलसीचे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेले आहे. सदरची मतदान यंत्रे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली आहेत.
0000