13 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वराह पूजन

नांदेड,(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता 10 सप्टेंबर पर्यंत झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 13 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकत्रितपणे वराह पूजन करून प्रशासनाचा निषेध करतील असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतरांनी दिले आहे.

दिनांक 29 ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदना नुसार 12 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली येथील कावड यात्रेत जात असताना शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटप झाला नाही, याबद्दल लवकरच कार्यवाही करू असे सांगितले होते. तसेच 20 ऑगस्ट रोजी पिक विमा वाटप करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले होते. पण आज पर्यंत पिक विमा वाटप करण्यात आलेला नाही. यावरून प्रशासन निगरगट्ठ झाल्याचे दिसत आहे.

या विरोधात तसेच शेतकऱ्यांना पेरणी, खुरपणी, पीक कापणी अशी सर्व कामे मनरेगा मध्ये समाविष्ट झाली तर शेतकऱ्यांतील समन्वय टिकून राहील. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही त्यामुळे होणारा खर्च शेतीतील उत्पन्नापेक्षा जास् होत आहे. म्हणून मजुरांची योग्य मजुरी शेतकरी देऊ शकत नाही. मजूर गाव – खेडी सोडून महानगरांमध्ये स्थलांतरित होत आहेत. शेतीची सर्व कामे पेरणी ते कापणी पर्यंत ही मनरेगा मध्ये समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात आहे. शेतकऱ्यांचा सर्व खर्च वाढत असून त्यांच्या साठीच्या सर्व कामांसाठी जीएसटी वगळण्यात यावी, अशीही विनंती या निवेदनात आहे. सोयाबीन पीक आजच्या बाजार भाव हे शासनाच्या हमी भावा पेक्षा नक्की कमी आहेत. तेव्हा खाजगी व्यापारी कमी दराने सोयाबीन खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही लूट रोखण्यासाठी शासनाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावेत.

या निवेदनातील सर्व मागण्या 10 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकंदरीत सर्व प्रशासकीय यंत्रणेचा निषेध करण्यासाठी 13 सप्टेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व शेतकरी वराह पूजन करण्यात करतील असे या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे महानगर प्रमुख स. प्रीतपाल सिंघ शाहू,जिल्हाध्यक्ष विठ्ठल कल्याणकर, कामगार जिल्हाध्यक्ष अजय हनुमंते, उपशहर प्रमुख बालाजी अंभोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.या निवेदनाची एक प्रत पोलीस अधीक्षक नांदेड यांना पण देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!