नांदेड,(प्रतिनिधी)-शहरातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धनाथपुरी चौफाळा येथे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर छापा टाकछन दहा जुगारांवर पुन्हा दाखल केला आहे, आणि त्यांच्याकडून 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.
दिनांक 29 ऑगस्ट रोजी पोलीस ठाणे द्वारा येथील गुन्हे शोधपथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, पोलीस अंमलदार देविदास बिसाडे, मोहन हाके, लक्ष्मण दासरवाड, धीरज कुमार कोमलवार,संघरत्न गायकवाड, नागेश वाडियार आदी गस्त करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी सिद्धनाथपूरी चौफळा येथे एका पडक्या घरात छापा टाकला. त्या ठिकाणी दहा लोक होते त्यातील दोन पळून गेले इतर 8 लोकांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून जुगार खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 24 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणात दहा जुगारांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) नुसार गुन्हा क्रमांक 326/ 2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार एन.डी. कस्तुरे यांच्याकडे देण्यात आला
आहे. दोन जण पळून गेले ते हा जुगार अड्डा चालवणारे भागीदार आहेत अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
या जुगार अड्ड्यात पकडण्यात आलेल्या आठ जणांची नावे संतोष बालाजी खैरे (42),हडको नांदेड, संजय भगवान माने (27) चौफळा, अभिजीत सत्यप्रकाश ठाकूर (26) चिराग गल्ली, राजेश शंकरराव सौराते (38) आलेगाव ता. पूर्णा, सय्यद सरवर उर्फ बाबा सय्यद इब्राहिम(26) बैल मार्केट, तालीम कुरेशी चांदपाशा कुरेशी (24) प्रीती नगर, मंगेश हिम्मतलाल लखनौवाले(27) सिद्धनाथ पुरी अशी आहेत. पळून गेलेल्या दोघांची नावे बाबुराव उर्फ राजू गणेश हरकरे (28) आणि गोविंद गणेश हरकरे (22) सिद्धनाथपुरी नांदेड अशी आहेत.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव पोलीस, उप अधीक्षक सुशील कुमार नायक आदींनी इतवारा पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे आणि त्यांच्या पोलीस पथकाचे जुगार अड्ड्यावर छापा टाकून कार्यवाही केल्याप्रकरणी कौतुक केले आहे.