नांदेड(प्रतिनिधी)-महात्मा फुले आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.दिपेश शर्मा यांच्या घरातून त्याचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरीला गेल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेजसह तक्रार दिली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे नांदेड जिल्हा समन्वयक डॉ.दिपेशकुमार द्वारकादास शर्मा यांचे मारवाडी धर्मशाळा वजिराबादच्या पाठीमागे घरआहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 ऑगस्टच्या सायंकाळी 7.53 वाजत त्यांच्या घराची दारे उघडीच होती. त्यावेळी कोणी तरी चोरट्याने त्यांनी घरात ठेवलेला 20 हजार रुपये किंमतीचा ामोबाईल चोरून नेला आहे. डॉ.दिपेश शर्मा यांनी आपल्या घरात आणि इतरांच्या घरात असलेेले चार सीसीटीव्ही फुटेज जोडून ही तक्रार दिली आहे. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा बालक हा अल्पवयीन असावा असे वाटते. त्याने पांढरा शर्ट परिधान केलेला आहे आणि तो चारही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. वजिराबाद पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा क्रमांक 427/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
सीसी टीव्ही फुटेज…