नांदेड :- केंद्रीय रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंघ यांनी नांदेड येथील दौऱ्यात सुप्रसिद्ध श्री हजूर साहेब सचखंड गुरुद्वारास भेट देवून दर्शन घेतले. यावेळी गुरुद्वाराचे पुजारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्यासोबत त्यांच्या आई जसबीर कौर यांचीही उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सचखंड गुरूद्वाराचे मुख्य पुजारी संत बाबा कुलवंत सिंघजी जथेदार, संत बाबा रामसिंघजी सहायक जथेदार, अधीक्षक सरदार राज देवेंद्र सिंघजी, सहायक अधिक्षक स. रविंद्रसिंघ कपूर, जयमलसिंघ ढिलो, रविंद्रसिंघ बुंगई, राजेंद्रसिंघ पुजारी, रेल्वेचे प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक बी नागया, बांधकाम मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अग्रवाल, विभागीय क्षेत्रिय व्यवस्थापक निती सरकार, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, दिलीप कुंदकुर्ते, संतुक हंबर्डे, आदींची उपस्थिती होती.
More Related Articles
राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड चाचणी*
नांदेड :- राष्ट्रीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन राजस्थान राज्यात जयपूर येथे 7 ते 13…
उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे
_साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम_ नांदेड -शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन…
चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंग जहागीरदार यांची निवड
नांदेड -चीनमध्ये होणाऱ्या युनिव्हर्सिटी आर्चरी क्रीडा स्पर्धेसाठी तेजबीरसिंग जहागीरदार यांची निवड झाली यांच्या निवडी बद्दल…