नांदेड – शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक, शाखा कार्यालय, किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. अनुसूचित जमातीचे सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरूपात अल्प व्याज दराने एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय किनवट यांच्यामार्फत सन 2024-25 साठी राज्य शासन पुरस्कृत महिला सशक्तीकरण योजना व मुदत कर्ज योजनांचा लक्षांक प्राप्त झाला आहे. हा लक्षांक प्रकल्प कार्यालय, किनवट व कळमनुरी अंतर्गत नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यासाठी आहे. अनुसूचित जमातीचे सुशिक्षीत बेरोजगांरानी दिलेल्या लक्षाकांसाठी ऑनलाईन पध्दतीने www.mahashabari.in या संकेतस्थळावर कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबरपर्यत सा करावत असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक शाखा किनवट कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक पी.सी. राठोड यांनी केले आहे.
किनवट व कळमनुरी प्रकल्प कार्यालय अंतर्गत महिला सबलीकरण योजनेसाठी 9, कृषी आणि संलग्न व्यवसाय या योजनेसाठी 2, हॉटेल ढाबा व्यवसायासाठी 3, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप 3, वाहन व्यवसायासाठी 2, वाहन व्यवसाय 10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लक्षापर्यत 3, लघु उद्योग व्यवसाय 3, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा 2, स्वंय सह्याता बचतगट 3 असे एकूण 30 चा लक्षांक प्राप्त झाला आहे.