ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी त्या “काळे – गोरे’ धंदेवाल्या पत्रकाराला काव्यातून फटकारले

नांदेड – हिला आपल्या सौंदर्यावरती गर्व करतात असे आपण ऐकलेत आणि पाहिलेत. एवढेच नव्हे तर एका डॉक्टर महिलेने परमेश्र्वराने महिलांना बनवलेच असे आहे की, पुरूषांसाठी ते आर्कषण असते असे भाषणात सांगितले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी संत मुक्ताबाई यांचे उदाहरण सुध्दा यावेळी दिले होते.परंतु एखादा पुरुष आपल्या गोऱ्या चामडीचा फायदा घेऊन “काळे’ धंदे लपवण्याचा केलेला केविलवाना प्रयत्न महाराष्ट्राच्या माध्यमाने नुकताच पहिला आहे. केवळ बनवाबनवी करणे , अनेक थोर मोठ्यांच्या ओळखी सांगणे किंवा त्यांचा नातेवाईक असल्याचे भासवून अमाप संपत्ती जमवण्याचा हव्यास बाळगून पत्रकारितेच्या नैतिकतेवर उभ्याने मुतने असा काळा गोरा धंदा करणाऱ्या एका बड्या पत्रकाराला कंपनीने कंबरड्यात लाथ घालून हाकलून लावल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर नांदेडसह संबंध महाराष्ट्रातील पत्रकारितेमध्ये खळबळ माजली. यानंतर नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा शीघ्र चारोळीकर, कवी, समीक्षक अनिकेत कुलकर्णी यांनी आपल्या धारदार शब्दाने चांगलेच फटकारले आहे.नांदेड येथून आपल्या तुटक्या फाटक्या पत्रकारितेला सुरुवात करणाऱ्या या भुलभुलय्या पत्रकाराने लोकांनी लिहून दिलेल्या बातम्या, लेख, संडे मंडे स्पेशल प्रकाशित करून स्वतःचे नाव करण्याचा प्रयत्न केला. खरे तर “आयजीच्या जीवावर बायजी उदार ध्या दिवट्या रात्री अंधार’ असाच हा प्रकार होता. संबंध महाराष्ट्राच्या पत्रकारितेला त्याच्या लेखणीचा पूळचटपणा माहित आहे. चाटाळ पत्रकारिता करून पाय चाटण्यापलीकडे त्याला काहीही जमले नाही. याच बळावर त्याने महाराष्ट्रातील एका बड्या दैनिकात काम मिळवले. तिथे गेल्यानंतर मायानगरीच्या मोहपाशात तो अडकला नाही असे होऊ शकत नव्हते. बस स्टॅंड वरील वेश्येकडे ही आशेने बघणाऱ्या या पत्रकाराने मुंबईतली मायागिरी पाहून चांगलाच चेकाळून गेला होता. म्हशी बद्दल अशी एक म्हण आहे की, ती जेंव्हा आपले बालपण पुर्ण करते आणि युवा अवस्थेत येते तेंव्हा बोंगारली असे म्हणतात. काळे-गोरे पत्रकाराचे पण असेच काही झाले. मुंबई गेल्यानंतर त्याने जी कारस्थाने केली ती कारस्थाने पत्रकारीतच काय परंतु एखाद्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीलाही शोभत नाहीत इतके शूद्र प्रवृत्तीची होती. आपण महाराष्ट्रातील पत्रकारांचे तारणहार आहोत. आपल्या शिवाय अन्य संघटना तुच्छ आहेत. आपणच आता पत्रकारांचे संपूर्ण आयुष्य उभारू असा आव आणून आपणच उध्दारक असल्याचे भासवत त्यांने “पत्रकारांचा आवाज’ ही संघटना उभी केली. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पैसा फावड्याने ओढला. या काळात ज्या समूहाने त्याला नोकरी दिली होती त्या समूहाने त्याला लेखनिक असिस्टंटही पुरवली होती. पठ्याला गोरी चामडी आवडू लागली. मात्र त्या लेखनिक असिस्टंट यांच्या सोबतही त्याने रासलीला खेळण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा आहे. तर दुसरीकडे एका सुरेल आवाजाच्या कावळीनीला आपल्या बाहूपाशात ओढले. तिचाही संसार उध्वस्त केला . जेव्हा तिच्यातील त्याचा इंटरेस्ट कमी झाला आणि ती त्याला गान कोकिळे ऐवजी कावळा वाटू लागली तेंव्हा हे प्रकरण बाहेर आले. मग मुंबई पोलिसात तक्रार झाली. आपला बचाव करण्यासाठी या बोरुबहाद्दराने आपल्या ताकदीचा वापर केला. तरीही प्रकरण मिटत नसल्याने अखेर तिचे दोन्ही पाय धरून पायावर डोके टेकवले. लोळण घेतल. अख्या मुंबईकरांसमोर माफी मागितली. एवढेच नाही तर यासाठी मोठी किंमत मोजून सदरील गान कोकिळीला त्याने मुंबईत मोठी सदनिका घेऊन दिल्याची चर्चा आहे. एकीकडे गोरी चमडी, चाटाळ शब्द लोकांच्या समोर ठेवत आपण कसे चांगले आहोत हे भाषविण्याचा त्याने केलेल्या प्रयत्न गानकोकिळेच्या लव स्टोरी ने चांगले चर्चेत आले होते.एवढेच नाही संबंध महाराष्ट्रातील आतापर्यंत झालेल्या कोणत्याही पत्रकाराने जी ग्रंथसंपदा निर्माण केली नाही. तो पुस्तक लिहिण्याचा विक्रम या लेख चोरांनी केला आहे. अमेरिका, इंग्लंड अशा बाहेर देशात जाऊन पुस्तकाचे प्रकाशन केले. त्याचा गंडाही कंपनीलाच घातला. स्वतःची चड्डी बनियान स्वतःच्या पैशाने घेण्याची किंमत नसणाऱ्या या हिरोने अमेरिकेत पुस्तकाचे प्रकाशन करून महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात आपल्यापेक्षा मोठा साहित्यिक नाही हे भासाविण्याचा प्रयत्न केला. गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी, प्र.के.अत्रे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अलीकडच्या काळातील कुमार केतकर, गिरीश कुबेर, उत्तम कांबळे यांच्यासारख्या विभूतींनी पत्रकारितेेत राहून जी ग्रंथ संपदा निर्माण केली, जे विचार दिले. त्या विचारावर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत चालतो आहे. त्यांचे अनुकरण करतो आहे. परंतु याही विभूतींच्या पुस्तकांपेक्षा आपल्या पुस्तकांचा खप जास्त असल्याचे भासावण्याचा काळे गोरे ने केविलवाना प्रयत्न केला. एवढेच नाही तर एका एका पुस्तकाची 30-30 आवृत्ती संपल्याचेही सोशल मीडिया वरती टाकून जगातील सगळ्यात मोठा लेखक,पत्रकार असल्याचे त्यांने वातावरण निर्माण केले होते. याबाबतीत त्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. पण ते कौतुक कशाने करावे हा विषय शिल्लक राहतो आहे.किती फेकावे आणि कसे फेकावे याचे जणू विद्यापीठ असलेल्या या काळेगोरे पत्रकाराने महाराष्ट्राच्या पत्रकारितेलाच काळीमा फासला आहे. ज्या कंपनीने अत्यंत विश्वास टाकून ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या त्या कंपनीची माय बहिण एक करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. प्रवासांचे खोटे बिले सादर करून कंपनीला चांगलेच लुटून खाले. मुळात ही बिले काही लोखंडी पुरूषांनीही दिली होती. ही बाब जेव्हा कंपनीच्या लक्षात आली तेव्हा कंपनीने बुटासकट कंबरड्यात लाथ घालून बाहेर काढल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता “माझ्या मातीत मी काम करायला परत येणार आहे. मला मायानगरीत राहून फारसे करमत नाही. माझी मातृभूमी, माझी जमीन, माझे गाव मला बोलावत आहे’ असा आणखीन एक पुळचट भाव लोकांच्या मनात निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. स्वतःची किंमत घालून बसलेल्या या पत्रकाराला आता नांदेडमध्ये कोण थारा देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.तर ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी काल सकाळीच प्रसिद्ध केलेली चारोळी या काळे गोरे पत्रकाराच्या गोरख धंद्याला चांगलेच फटकारणारी आहे. रोखठोक पत्रकार म्हणून ओळखले जाणारे अनिकेत कुलकर्णीच्या धारदार बंडखोर शब्दाने सदरील भोंदू बाबा पत्रकाराचे फाडलेले कपडे आणि त्याचा खरा चेहरा समोर आणल्याने आता ह्या कवितेची ही जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे भविष्यात आता हा भोंदू पत्रकार नेमका कोणत्या संपादकाला गंडा घालतो आणि कोणत्या कंपनीचा वॉशआउट करतो याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!