धम्मचळवळीत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र महत्वपूर्ण ; पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांचे प्रतिपादन 

खुरगावला श्रावण पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न 
नांदेड – श्रामणेर प्रशिक्षण केंद्र परिसरात श्रामणेरांच्या दीक्षाभूमीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. भदंत पंयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर कार्य होत आहे. धम्मचळवळीत हे केंद्र मैलाचा दगड ठरले असून या परिसरात उपासक उपासिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो आणि भिक्खू संघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
           ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात श्रावण पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राणपाठ, गाथापठण, बोधीपूजा, ध्यानसाधना, भोजनदान आदी कार्यक्रम संपन्न झाले. मुख्य समारंभात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले. उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. तसेच त्रिरत्न वंदना घेण्यात आली आणि अष्टशील, दसशील देण्यात आले. दहा मिनिटे आनापान ध्यानसाधनाही झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली. शेवटी भिक्खू संघाची धम्मदेसना संपन्न झाली.
         दरम्यान, पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या पार्किंग परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जलसिंचन करुन वृक्ष संवर्धनाचे महत्व त्यांनी कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर स्वागतनगर येथील उपासिका सुशिला हिंगोले, शोभा हटकर, सुमन नरवाडे, पंचशिला कोकाटे, वर्षा सोनाळे, शैलजा लोणे, सुनिता सोनकांबळे, सुनंदा सोनकांबळे, शिवगंगा वाटोडे, पद्मावती चौदंते, वंदना गोवंदे, सुलोचना रायबोळे, गौतमी नरवाडे, नंदा सुगंधे यांच्यासह सुनिता पिंपळे, निलावती लोणे, सपना वाघमारे, सुनिता इंगोले, भारती राऊत, कविता शृंगारे, अर्चना आवटे, ज्योती जमदाडे, शिला कांबळे, पंचफुला सदावर्ते, जयश्री नरवाडे, सुरेखा इंगोले, सोनी चव्हाण, वैशाली हिंगोले, शुभांगी तुरुकमाने, मिनाक्षी तुरुकमाने, अरुणा गच्चे या महिलांनी उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका यांना भोजनादान दिले. भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!