नांदेड(प्रतिनिधी)-केंद्र शासनाच्या सीएससी 2.0 योजनेअंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये 15 महाविद्यालयात प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग (माहिती व तंत्रज्ञान) यांनी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना व सनियंत्रण व प्रशासकीय नियंत्रण जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविली आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील 10 तालुक्यात 15 महाविद्यालयांमध्ये प्रायोगिक तत्वावर आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हा निर्णय राज्यभर लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. महाविद्यालयातील आपले सरकार सेवा ई सेवा केंद्रास मंजुरी देतांना संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्याने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच कार्यवाही करतांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादीत यांच्याशी तांत्रिक सहाय्याकरीता समन्वय साधावा असे सांगितले आहे. राज्य शासनाने आपला हा शासन निर्णय संकेतांक क्र्रमांक 202408201204318607 द्वारे आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.