नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्रात तिसरी आघाडी उदयास आली असून यामध्ये नव्याने स्थापन झालेले आता महाराष्ट्र राष्ट्र समिती हा पक्ष परिवर्तन आघाडीचा घटक पक्ष म्हणून आगामी विधानसभा निवडणुका पुर्ण ताकतीनिशी लढविणार असल्याचे य पक्षाचे संस्थाचे अध्यक्ष माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेला नाना गाडबैले, निलमताई खेमनर, शंकरराव गौडसे, सोमनाथ बोराडे, दत्ता कारामुंगे, दिलीप धोंडगे, केशव शिंदे, शिवराज धोंडगे यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी माजी आ.शंकरअण्णा धोंडगे हे बोलत असतांना म्हणाले की, राज्यामध्ये भारत राष्ट्रीय समितीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तयार झाले होते. पण काही तांत्रीक अडचण आल्यामुळे राज्यातील बीआरएसचा प्रभाव कमी झाला. या पक्षातील सर्व कार्यकर्ते सोबत घेवून नवीन पक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या पक्षाचे नाव महाराष्ट्र राष्ट्र समिती(एमआरएस) असे निर्माण केले आहे आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आणि समविचारी पक्षाशी चर्चा करून आगामी विधानसभा निवडणुक लढविणार यामध्ये वामनराव चट यांची शतकरी संघटना, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमच एमआरएस या तिन पक्षाने एकत्र येवून परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी मतदारांना एक चांगला पर्याय म्हणून समोर येणार आहे. अनेक पक्षांशी आमची बोलणी सुरू आहे. येणाऱ्या काळात या आघाडीमध्ये अनेक पक्ष सहभागी होती असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य समितीचे पहिले राज्य पातळीवरील अधिवेशन 5 सप्टैंबर रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनाला किमान 50 हजारांच्या जवळपास कार्यकर्ते सहभागी होती असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला आणि याच अधिवेशनात अनेक पक्षातील नेते मंडळी कार्यकर्ते सहभागी झाले चित्र दिसेल असा विश्र्वास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शंकरअण्णा धोंडगे यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यसमिती जाहीर यामध्ये गजानन अमदाबादकर अकोला, माजी आमदार मनोहरराव पटवरी लातूर, जगदीश नाना बोंढे अमरावती, माजी आ.बाळासाहेब साळुंके चंद्रपुर, प्रा.मारोती जाधव सोलापूर, संदीप लगड पुणे, दत्ता पवार नांदेड, रामजीवन बोंदर धाराशीव, भैय्यासाहेब, हनमंतराव मोटसट यांचा या कार्यसमितीत सहभागी आहे.