नांदेड(प्रतिनिधी)-राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मोठ्याप्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. पण या योजनेला विरोध करायचा नाही. या अगोदरही अनेक योजना महिलांसाठी जाहीर करण्यात आल्या. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जाहीरातबाजी करण्यात आली नव्हती. गणिमीकावा वापरून या योजनेची खिल्ली उडवायची पण विरोध करायचा नाही असा सल्ला शिवसेनेचे नेते माजी मंत्री भास्कर जाधव यांनी शिवसैनिकांना दिला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव विधानसभा आढावा बैठकीच्या अनुशंगाने नांदेड येथे ते आले असता कार्यकर्त्यांशी बोलतांना ते म्हणाले की, येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी काही शिवसैनिकांशी ते बोलत असतांना म्हणाले की, सध्या राज्यामध्ये लाडकी बहिण योजना ही गाजत आहे. पण या योजनेला विरोध करू नका. उपस्थितीत असणाऱ्या महिलांना त्यांनी तुम्ही या योजनेचे किती अर्ज भरून घेतल्या अशी विचारणा केली. मात्र असमाधानकारक उत्तर मिळाल असल्याने मराठवाड्यात महिलांच संघटन कमकुवत आहे असेही त्यांनी सांगितले. याचबरोबर या योजनेच्या अगोदर महिलेसाठी निराधार महिला योजना, श्रावणबाळ योजना अशा अनेक योजना राज्य शासनाने महिलांसाठी आणल्या आहेत. शासन बदलल की, नवीन योनजना येतात. त्यातच लाडकी बहिण योजना ही एक आहे. पण कार्यकर्त्यांनी योजनेला विराध न करता या योजनेतील त्रुटी शोधून या योजनेची खिल्ली उडवायची असा सल्ला दिला. त्यामध्ये सांगितले की, या योजनेत अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, 65 वर्ष वरील महिला या योजनेत सहभागी नाहीत तर एकाच कुटूंबात 21 ते 25 वयोगटातील तीन मुली असतील तर त्या पैकी एकाच मुलीला लाभ दिला जातो. बाकी काय मुख्यमंत्र्यांच्या बहिणी नाहीत काय? ज्यांचे हातपाय थकल्यानंतर त्यांना आधार द्यायचा नाही काय ? या काय लाडक्या बहिणी नाहीत काय? अशी खिल्ली उडवून या योजनेचे प्रत्येकाने अर्ज भरावा असाही सल्ला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी कार्यकर्त्यांना दिला.