न्यायालयाच्या आदेशामुळेच भोकर येथील भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला

नांदेड(प्रतिनिधी)-काल 17 ऑगस्ट रोजी भोकर येथे श्री संत सेवालाल महाराजांच्या स्मारक जागेवर न्यायालयाच्या आदेशाने भुमिपुजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर बरेच वाद समोर आले. परंतू हा भुमिपुजन सोहळा न्यायालयाच्या प्रक्रियेत अडकतो काय याची भिती तयार झाली होती. एका ज्येष्ठ वकीलांनी केलेल्या मदतीनंतर सरकार पक्षाने मांडलेली बाजू न्यायालयाने ग्राहय मानली आणि जैसे थे आदेश मागणीचा अर्ज फेटाळून लावल्यानेच हा उद्‌घाटन सोहळा पार पडला. ज्यांनी या प्रकरणात कामच केले नाही अशा लोकांनी कामाचे श्रेय आपल्याकडे ओढून घेतले. कारण पुढे त्यांना सुध्दा पद हवे आहे.
भोकर येथील गट क्रमांक 33 मध्ये श्री संत सेवालाल महाराज यांचे स्मारक तयार करण्यासाठी ती जागा राखीव ठेवण्यात आली होती. भोकर येथील दत्तात्रय गोविंदराव देशपांडे यांनी या जागेवर मालकीचा दावा दाखल केला आणि 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या त्या ठिकाणच्या कार्यक्रमांना जैसे थे स्थिती मिळावी असा अर्ज भोकर न्यायालयात केला. या वादात देशपांडेंनी जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर, तहसीलदार भोकर, कार्यकारी अभियंता भोकर आणि मुख्याधिकारी भोकर यांना प्रतिवादी केले होते.या वादाची सुनावणी 17 ऑगस्ट रोजी होती आणि 17 ऑगस्ट रोजीच पालकमंत्री गिरीश महाराज आणि राज्य सभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते 7 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भुमिपुजन होणार होते. परंतू न्यायालयात वाद असल्याने या जागेवर श्री.संत सेवालाल महाराज स्मारकाचा कार्यक्रम पार पडेल की नाही याची शंका होती.
नांदेड येथील जिल्हा अभियोक्ता कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी यांचे वकील म्हणून ऍड.एम.ए.बत्तुल्ला यांना पाठविण्यात आले. मुख्याधिकारी भोकर यांचे वकील ऍड.शिवाजी कदम हे होते. या प्रकरणाशी संबंधीत सर्व मंडळी न्यायालयात ठाण मांडून बसली होती. सरकारी अभियोक्ता ऍड.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी माजी जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.बी.आर.भोसले यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणात सादरीकरण केले. न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्यांच्या आधारावर आणि युक्तीवादाला अनुसरून न्यायालयाने देशपांडे यांचा जैसे थे परिस्थितीचा मागणी अर्ज फेटाळून लावल्यानेच हा भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
या प्रकरणात ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही, अधिकार नाही अशा एका व्यक्तीने न्यायालयाचा आदेश होताच न्यायालयाबाहेर येवून तुमच्या भुमिपुजन सोहळ्याचा मार्ग मोकळा केल्याची माहिती दिली. भुमिपूजन सोहळ्याचा मार्ग मोकळा झाला होतो न्यायालयाच्या आदशाने परंतू ही माहिती देणाऱ्याला लवकरच भविष्यात उच्च न्यायालयाने मागणी केल्याप्रमाणे एक पद हवे आहे आणि त्यात आपले नामनिर्देशन व्हावे यासाठी त्यांनी ही उचापत केल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!