नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चार जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना अवैध धंदे समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस अधिक्षकांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. त्यात चार जिल्ह्यातील पोलीस पथकांनी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 15 दिवसांमध्ये चार जिल्ह्यात 2 कोटी 28 लाख 59 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल अवैध व्यवसायीकांकडून जप्त केला आणि 1163 गुन्हे दाखल केले. शहाजी उमाप यांनी जनतेला सुध्दा अवैध्य धंद्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालय नांदेड यांच्यावतीने देण्यात आलेल्या प्रेसनोटनुसार पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रात आल्याबरोबर सर्व प्रकारच्या अवैध्य धंद्यांचे समुळउच्चाटन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार चार जिल्ह्याच्या पोलीस पथकांनी हातभट्टीची दारु, दारुचे रसायन, देशी दारु, विदेशी दारु, सिंधी, गुटखा, गांजा, जुगार, अवैध वाळु उत्खन्न व अवैध वाहतुक या सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये कार्यवाही करत कामाची सुरूवात केली. या कामासाठी नांदेड जिल्ह्यात पाच, लातूर आणि परभणी जिल्ह्यात प्रत्येक ार णि हिंोली जिल्ह्यात तिन विशेष पथके अशी एकूण 12 पथके परिक्षेत्रात कार्यरत आहेत.
मागील पंधरवाड्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रात पोलीसांनी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे नांदेड-356, परभणी-218, हिंगोली-213, लातूर 376 असे एकूण 1163 गुन्हे दाखल करण्यात आले. विविध अवैध्य व्यवसायीकांकडून नांदेड जिल्ह्यात 27 लाख 66 हजार 197, परभणी जिल्ह्यात 23 लाख 76 हजार 654, हिंगोली जिल्ह्यात 8 लाख 98 हजार 70 आणि लातूर जिल्ह्यात सर्वाधिक 1 कोटी 68 लाख 15 हजार 35 रुपयांचा मुद्देमाल असा एकूण 2 कोटी 28 लाख 59 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन केले आहे की, आपल्या भागात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती पोलीसांना देवून अवैध्य धंदे पुर्णपणे, समुळउच्चाटन करण्यासाठी पोलीसांच्या माोहिमेत हातभार लावावा.