राज्यात 11 राज्य सेवेच्या अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या
नांदेड(प्रतिनिधी)-गृहविभागाने राज्य शासनातील 11 पोलीस अधिकाऱ्यांना नवीन पदस्थापना दिल्या आहेत. त्या नांदेड येथे रिकाम्या झालेल्या अपर पोलीस अधिक्षक पदावर सुरज पांडूरंग गुरव यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागातील अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने आज 13 ऑगस्ट रोजी जारी झालेल्या आदेशात राज्य पोलीस सेवेतील 11पोलीस अधिकाऱ्यांना बदली देवून नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. त्यात नांदेडच्या अपर पोलीस अधिक्षक पदावर पोलीस अधिक्षक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोेग मुंबई येथील सुरज पांडूरंग गुरव यांना पाठविले आहे. सुरज गुरव या पुर्वी नांदेड शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी होते.
इतर अधिकाऱ्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिली आहे. पंकज नवनाथ शिरसाठ -अपर पोलीस अधिक्षक पालघर(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर),अतुल उत्तम झेंडे-अपर पोलीस अधिक्षक रायगड(पोलीस उपआयुक्त ठाणे शहर), रुपाली खैरमोडे(अंबुरे)-पोलीस उपआयुक्त ठाणे शहर(पोलीस अधिक्षक महामार्ग सुरक्षा पथक ठाणे), विनायक सुखदेव नरळे-कार्यकारी संचालक सुरक्षा व अंलबजावणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मुंबई(अपर पोलीस अधिक्षक पालघर), अभिजित सुरेश शिवथरे-सहाय्यक पोलीस महानिरिक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य मुंबई(अपर पोलीस अधिक्षक रायगड), राहुल अर्जुनराव माकणीकर-पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपुर(पोलीसउपआयुक्त नागपूर), लक्ष्मीकांत पाटील-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागापूर (पोलीस अधिक्षक सायबर सुरक्षा मुंबई), विजयकांत मंगेश सागर-पोलीस उपआयुक्त नागपुर शहर(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई), वैशाली ईश्र्वर कडूकर-प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर(अपर पोलीस अधिक्षक सातारा), दिपाली राजेंद्र घाटे-अपर पोलीस अधिक्षक ठाणे ग्रामीण(पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई) असे आहेत.