नांदेड(प्रतिनिधी)-राज्याच्या गृहाविभागाने भारतीय पोलीस सेवेतील आणि राज्य पोलीस सेवेतील एकूण 18 अधिकाऱ्यांना नवीन नियुक्त्या देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यात नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना हिंगोली पोलीस अधिक्षक पदावर पाठविले आहे.
आज जारी झालेल्या गृहविभागातील आदेशानुसार गृहविभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशानुसार नांदेडचे माजी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे जे पदस्थापनेच्या प्रतिक्षेत होते त्यांना हिंगोली पोलीस अधिक्षक पदावर नियुक्ती दिली आहे. याशिवाय बदलेले पोलीस अधिकारी पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे आहे. अतुल कुलकर्णी-पोलीस अधिक्षक धाराशिव (पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण), सुधाकर बी.पठारे -पोलीस उपआयुक्त ठाणे शहर(पोलीस अधिक्षक सातारा), अनुराग जैन-पोलीस उपआयुक्त नागपूर शहर-(पोलीस अधिक्षक वर्धा) विश्र्व पानसरे-पोलीस अधिक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर(पोलीस अधिक्षक बुलढाणा, 31 ऑगस्ट रोजी रिक्त होणाऱ्या पदावर), शिरिष सरदेशपांडे-पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण (पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे), संजय वाय.जाधव -अपर पोलीस अधिक्षक बारामती(पोलीस अधिक्षक धाराशिव), कुमारचित्ता अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली (पोलीस अधिक्षक यवतमाळ), आंचल दलाल -अपर पोलीस अधिक्षक सातारा(समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमंाक 1 पुणे ), नंदकुमार ठाकूर-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र दौंड), निलेश तांबे-अपर पोलीस अधिक्षक नंदुरबार(प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर), पवन बनसोड-पोलीस अधिक्षक यवतमाळ(पोलीस अधिक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अमरावती), नुरूल हसन-पोलीस अधिक्षक वर्धा(समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमंाक 11 नवी मुंबई), शेख समीर शेख असलम-पोलीस अधिक्षक सातारा(पोलीस उपआयुक्त मुंबई शहर), अमोल तांबे-पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे(पोलीस अधिक्षक/ दक्षता अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे), मनिष कलवाणीया-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(पोलीस उपआयुक्त मुंबई शहर), अर्पणा गिते-पदस्थापनेच्या प्रतिक्षेत(कार्यकारी संचालक सुरक्षा व अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मुंबई), दिगंबर प्रधान-पोलीस अधिक्षक/ दक्षता अधिकारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पुणे (पोलीस अधिक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर).दिगंबर प्रधान यांची बदली 8 ऑगस्ट रोजी पोलीस उपआयुक्त मुंबई शहर पदावर झाली होती. ती बदलून देण्यात आली आहे.