महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने शहरात “तिरंगा दौड मॅरेथॉन” संपन्न

नांदेड – राष्ट्रध्वजास समर्पित राष्ट्रभक्तीच्या भावनेने महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार “हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा” या अभियाना अंतर्गत महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिनांक ११.०८.२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून तिरंगा दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सर्व स्तरातील लोकांना सामील होण्यासाठी आणि आपल्या सर्वांना एकत्र बांधणाऱ्या राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्यासाठी या तिरंगा दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या तिरंगा दौड मॅरेथॉन रॅलीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या मॅरेथॉन रॅलीची सुरुवात केली.
या रॅलीमध्ये शहरातील युवक, शालेय विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था इत्यादी घटकांनी मॅरेथॉन मध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सदरील तिरंगा दौड मॅरेथॉन रॅली जिल्हाधिकारी परिसरा पासुन सुरुवात होऊन शहरातील शहरातील मुख्य रस्त्यावरून मार्गक्रमण करुन आय.टी.एम कॉलेज परिसर येथे या मॅरेथॉन रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, शिवाजी बाबरे, शिक्षणधिकारी राजेश पाताळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, निलावती डावरे, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, उपअभियंता प्रकाश कांबळे, ग्रंथपाल श्रीनिवास इज्जपवार व मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!