नांदेड(प्रतिनिधी)-दि.18 जानेवारी 2024 रोजी आयपीओ खरेदी केल्यावर पाच पट फायदा झाल्याचे आमिष दाखवून त्यांच्या बॅंक खात्यातून परस्पर गायब केलेल्या 71 लाख रुपये परस्पर वळती झाले होते. त्यातील 55 लाख रुपये परत मिळवून देण्यात नांदेड सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने यश मिळविले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जानेवारी 2024 रोजी एका फिर्यादीला आयपीओ खरेदी केले तर 5 पट फायदा होता असे आमिष दाखवले आणि ते एका ऍपद्वारे सेबी या संस्थेकडे नोंदणीकृत असल्याचे दाखवले आणि या खरेदीच्या व्यवहारात फिर्यादीच्या बॅंक खात्यातून 71 लाख रुपये परस्पर वळती झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर तक्रारदाराने नांदेड सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली.सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांनी ती तक्रार टोल फ्रि क्रमंाक 9030 द्वारे सायबर क्राईम हेल्पलाईनवर नोंदणी करून घेतली. पुढे ही तक्रार एनसीसीआरपी या पोर्टलद्वारे स्विकारून पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत बॅंकेच्या नोडल अधिकाऱ्याकडे मेलद्वारे पाठविली. या बाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 1/2024 दाखल करण्यात आला होता. बॅंकेच्या सोबत झालेल्या समन्वयातून सायबर पोलीसांना 63 लाख रुपये रोखून ठेवण्यात यश े. एव्या मोठ्या रक्कमेची ऑनलाईन फसवणूक नांदेडमध्ये पहिल्यांदाच झाली होती. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा करून केलेल्या मार्गदर्शनामुळे तक्रारदाराला न्यायालयाच्या आदेशाने 55 लाख रुपये परत मिळाले आहेत. पण उर्वरीत 8 लाख रुपयांबाबत अधिक तपास सुरू आहे. पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी ही कामगिरी करणाऱ्या पोलीस निरिक्षक धीरज चव्हाण, आर.बी.शेंडगे, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक मारोती चव्हाण, पोलीस अंमलदार विलास राठोड, काशिनाथ कारखेडे यांचे कौतुक केले आहे. पोलीसांनी तक्रारदाराच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. तक्रारदाराने सुध्दा पोलीसांना धन्यवाद दिले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, कोणासोबत ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ ती माहिती टोल फ्रि क्रमांक 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर नोंदवावी आणि आपल्यासोबत फॉर्ड झाल्याची माहिती सविस्तरपणे द्यावी. सोबतच cybercrime.gov.in या बेवसाईटवर जाऊन आपल्यासोबत झालेल्या फॉर्डची तक्रार करावी. त्यानंतर सायबर पोलीस ठाणे नांदेड किंवा आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी.