जिथे अशोक चव्हाणांची मुलगी उमेदवारी मागू शकते तर वसंत चव्हाणचा मुलगा का मागू शकत नाही

भोकरमध्ये आव्हान देणारा उमेदवार कॉंगे्रसकडे आहे
नांदेड(प्रतिनिधी)-राजकारणात घराणेशाही ही असतेच याचा खुलासा या माध्यमातून झाल्याचा आपल्याला सांगता येते. ज्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यंाची मुलगी उमेदवारी मागू शकते तर माझा मुलगा का उमेदवारी मागू शकत नाही असा सवाल करून खा.वसंत चव्हाण यांनी राजकारणातील घराणेशाहीला समर्थनच दिले आहे.
नांदेड येथे दि.11 ऑगस्ट रोजी कॉंग्रे्रस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आहे. या मेळाव्याच्या पुर्व तयारीच्या अनुशंगाने खा.वसंत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांनी नायगाव मतदार संघातून प्रा.रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात यावी असा प्रस्ताव जिल्हा परिषदचे माजी सभापती तथा नायगाव तालुकाध्यक्ष संजय बेळगे यांनी समोर ठेवला. याबाबत खा.चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले की, ज्या ठिकाणी अशोक चव्हाणांची मुलगी उमेदवारी मागू शकते तर माझा मुलगा का मागू शकत नाही. असे सांगून त्यांनी नायगाव विधानसभेवर प्रा.रविंद्र चव्हाण यांचा दावा भक्कम केला. याचबरोबर भोकर विधानसभ मतदार संघात कॉंगे्रस पक्षाकडे अशोक चव्हाण यांना आव्हान देणारा उमेदवार आमच्याकडे आहे. आता पर्यंत 14 लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. यामुळे निश्चितच भोकर विधानसभा आम्ही ताकतीने लढू असेही सांगितले. तर दुसरीकडे एका प्रश्नाला उत्तर देतांना ते म्हणाले की, नायगावमधून मिनल खतगावकर हे जर कॉंगे्रस पक्षाकडून उमेदवारी मागत असतील तर त्यास माझा विरोध राहणार असे सांगितले. यावेळी पत्रकारांनी खतगावकर यांनी लोकसभा निवडणुकीत तुम्हाला मदत केली असे म्हणताच खा.चव्हाण म्हणाले की, त्यांनी काय मदत केली ते सांगावे. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेच्या जागा लढविण्याची तयारी आम्ही केली आहे. या 9 जागांसाठी इच्छूक उमेदवारांचे अर्ज मागविण्याचे काम सध्या सुरू आहे. आतापर्यंत 52 जणांनी अर्ज आमच्याकडे सादर केले असून यासाठी 8 ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे. अनेक जण म्हणजे 8 तारेखपर्यंत अर्ज सादर करणार आहेत. त्यामुळे आमच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे असे ही खा.वसंत चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!