नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या मलाईदार विभागतून 18 जणांना दुसऱ्या विभागात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांच्या बदल्या या विदुषी बदल्या आहेत. म्हणजे त्यांचे विभाग बदललेले कागदोपत्री दाखवले असले तरी ते प्रत्यक्षात स्थानिक गुन्हा शाखेतच काम करणार आहेत. सोबतच स्थानिक गुन्हा शाखेत येण्याची सुध्दा अनेकांना घाई झाली आहे. त्यातील काही जणांनी हजारो मोदक कोणाकडे अग्रीम जमा केले आहेत. योग्य वेळी त्यांचा प्रसाद होईल. माजी विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी सुध्दा काही जण स्थानिक गुन्हा शाखेत पाठविले आहेत. तेंव्हा आता नवीन येण्यास इच्छूक असणाऱ्यांबाबत योगेश्र्वर काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हा शाखा या मलाईदार विभागातून एकदाच 18 जणांची बदली करण्यात आली. त्यापैकी पाच ते सहा जण फक्त भिंत बदलून तेथेच आहेत. बहुदा त्यांच्याकडे असलेली कामे नांदेड जिल्हा पोलीस दलात दुसरा कोणी करूच शकत नाही असा त्या भिंत बदलण्याचा आशय असेल. असो निर्णय तर योगेश्र्वरांचा आहे. याबदल्या झाल्यामुळे जिल्ह्यातील पोलीस दलाच्या अनेक पोलीस अंमलदारांना असे वाटत आहे की, आपण सध्दा ावेळेस ोगेश्र्वरांचा आशिर्वाद घेवून स्थानिक गुन्हा शाखेत जावे परंतू लाईन लांबलचक आहे. इच्छूक जास्त आहेत. त्यात नांदेड शहरात कार्यरत असलेल्या आपल्या अडनावातील अक्षरांमध्ये दोन मात्रा असलेल्या एका पोलीस अंमलदाराने 200 मोदक प्रसादासाठी योग्यवेळ तेंव्हा तयार असावेत अग्रीम ठेवले आहेत. याचा अर्थ मोदकांच्या प्रसादाशिवाय स्थानिक गुन्हा शाखेत जाता येत नाही काय? हा प्रश्न समोर येत आहे. मग जे प्रसाद ठेवून तेथे जातील ते काय करतील. याचे उत्तर शोधणे बहुदा अवघड आहे.मोदकवाला पोलीस अंमलदार आलाच तर स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षकांना मात्र तो अनेक कारणांनी मदतगारच ठरणार आहे.
पण स्थानिक गुन्हा शाखेत जाण्यासाठी इच्छूक असणाऱ्या महिला व पुरूष पोलीस अंमलदारांची अशी अपेक्षा आहे की, योगेश्र्वरांनी खऱ्या अर्थाने स्थानिक गुन्हा शाखेत आपल्या कामाला न्याय देवू शकेल, आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडू शकेल अशा व्यक्तीलाच तेथे नियुक्ती द्यायला हवी. यदा-कदा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीचे अजून काही पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हा शाखेत पाठविण्यात आले तर सर्वसामान्य पोलीस अंमलदारांना या शाखेत प्रवेश मिळणे दुरापास्तच दिसत आहे.