7 ऑगस्ट रोजी राज ठाकरे नांदेडमध्ये

नांदेड -आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून आगामी विधानसभा निवडणूकीची जोरदार तयारी करिता महाराष्ट्रभर दौरा आयोजित केला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तयारी सुरू केली

या पार्श्वभूमीवर मनसे पक्ष अध्यक्ष राज ठाकरे हे दिनांक 7 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष मोंटीसिंग जहागीरदार यांनी दिली आहे

राज ठाकरे हे बुधवार 7 ऑगस्ट रोजी लातूरहून आपल्या खाजगी वाहनाने नांदेड येथे सायंकाळी 9 वाजता येत असून नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचा मुक्काम असणार आहे

गुरुवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील मनसे पदाधिकारी यांचा आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन करणार आहेत तसेच इच्छुक उमेदवार संदर्भात चाचपणी करणार असून त्यानंतर सायंकाळी वारंगा मार्गे हिंगोलीला रवाना होतील

सदरील आढावा बैठकीस नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विद्यार्थी सेना तसेच महिला सेनेच्या पदाधिकारी यांच्यासह अंगीकृत संघटनेचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा सचिव, तालुका अध्यक्ष, तालुका सचिव, उप तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष शहर सचिव, शहर उपाध्यक्ष यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आजी-माजी पदाधिकारी व मनसे सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, रवी राठोड, विनोद पावडे, महिला सैन्याच्या जिल्हाध्यक्षा उषाताई नरवाडे, मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!