राज्यभरात 610 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पद; नांदेड जिल्ह्यातील 18 जणांचा समावेश

नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळवून ते कमीत कमी पोलीस उपनिरिक्षक व्हावेत या लढ्याला यश आल्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाने वेगवेगळ्या वेळेस पोलीस अंमलदारांना पदोन्नत्या देवून पोलीस उपनिरिक्षक केले आहे. काल अस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांच्या स्वाक्षरीने आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेने राज्यभरात 610 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक केले आहे. त्यातील काही अगोदरच श्रेणी पोलीस उपनिरिक्षक झाले होते. नांदेड जिल्ह्यातील 19 जणांना याचा लाभ मिळाला आहे. त्यातील आठ जणांना मात्र दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे.
पोलीस अंमलदार झाल्यानंतर त्यांच्या पदोन्नतीमध्ये अडचण येणारे पोलीस नाईक हे पद समाप्त करण्यात आले. तसेच लोकसेवा आयोग महाराष्ट्राच्यावतीने होणाऱ्या परिक्षांमधील परिक्षार्थींना 50 टक्के जागा, विभागीय परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या पोलीस अंमलदारांना 25 टक्के जागा आणि निव्वळ पदोन्नतीने पद प्राप्त करणाऱ्या पोलीस अंमलदारांना 25 टक्के जागा असा हा वाटा ठरला. मागील विभागीय परिक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या बऱ्याच पोलीस अंमलदारांना श्रेणी पोलीस उपनिरिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. परंतू त्या पदोन्नतीमध्ये पदाचे फायदे मिळत नव्हते. त्यात 25 टक्के प्रमाणे काल पलीस महासंचालक कार्यालयाने राज्यभरातील 610 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती दिली आहे.
त्यात नांदेड जिल्ह्यातील हेमंत दत्तोपंत देशपांडे, सुनिल बाबूराव सुर्यवंशी, बालाजी श्रीहरी गिते, बाबू रघुनाथ हिमगिरे, शंकरराव रावसाहेब देशमुख, उमेश उध्दवराव कारामुंगे, ज्ञानोबा मारोती गिते, गौतम हनुमंत वाहुळे, सुर्यकांत काशिनाथ काठोड, गंगुताई पोशट्टी नर्तावार, कैलास सुर्यभान देवगरे या 11 जणांना पदोन्नती देवून नांदेड पोलीस परिक्षेत्रात नियुक्ती दिली आहे. यापुढे नांदेड जिल्ह्यातील प्रदीप पांडूरंग राठोड, शेषराव लक्ष्मण शिंदे, शामसुंदर गोविंदराव नागरगोजे या तिघांना पदोन्नती देवून कोकण विभाग मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. संभाजी संग्राम गुट्टे, राजेश होनाजीराव वरणे या दोघांना लोहमार्ग मुंबई येथे नियुक्ती दिली आहे. रंगनाथ सिताराम केंद्रे अणि काकासाहेब नागोराव रोडके या दोघांना ठाणे शहरात नियुक्ती दिली आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाने 610 पोलीस अंमलदारांच्या पदोन्नतीची पिडीएफ संचिका वाचकांच्यासोयीसाठी बातमीसोबत जोडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!