नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस कुटूंबियांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री (गृह) यांच्या अध्यक्षतेत 12 सदस्यीय समिती गठीत केली आहे.
राज्याच्या गृहविभागातील उपसचिव चेतन निकम यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पोलीसांच्या विविध समस्या संदर्भात त्यांच्या कुटूंबियांकडून आलेल्या निवेदनाच्या आधारावर पोलीस कुटूंबियांना येणाऱ्या समस्या, अडचणींवर विचार-विनियम करून तोडगा काढण्यासाठी शासनाने या समितीचे गठण केले आहे. ही समन्वय समिती पोलीस कुटूंबियांच्या अडचणीसंदर्भात जसे कौशल्य कार्यक्रमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, निवासस्थाने, आरोग्य आदी वेगवेगळ्या समस्यांवर विचार विनिमय करून त्याचे निराकरण करण्यासाठी शासनाला उपाय योजना सुचवेल.
या समितीमध्ये उपमुख्यमंत्री(गृह) हेअध्यक्ष असतील इतर 11 सदस्यांमध्ये शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रसाद लोढा, विधानसभा सदस्य कालीदास कोळंबकर, राम कदम,सिध्दार्थ शिरोळे, विधान परिषद सस्दय परिणय फुके, अपर मुख्य सचिव गृृहविभाग, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त ब्रृहण मुंबई, उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, राहुल अर्जूनराव दुबाले(बीड) यांची नावे आहेत. महाराष्ट्र शासनाने आपला हा निर्णय संकेतांक क्रमांक 202407311717334129 प्रमाणे शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.