नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने मुंबई येथे सन्मान करण्यात आला.
नांदेड शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अश्वारुढ स्मारक व्हावे यासाठी नांदेड येथील धनगर समाजाने आमदार बालाजी कल्याणकर यांच्याकडे मागणी लावून धरली होती. आ.कल्याणकरांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत लावून धरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आश्र्वासनाला फक्त होकारच दिला नाही तर भरीव निधी सुध्दा जाहीर केला. या संदर्भाने धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुंबई येथील वर्षा बंगल्यावर सन्मान करण्यात आला. लवकरच या स्मारकाच्या जागेचे भुमिपुजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
आ.बालाजी कल्याणकर, नांदेड पंचायत समितीचे सभापती देविदास सरोदे, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे, राष्ट्रवादी ओबीसी प्रदेश संघटक भारत कागडे, शिवसेना तालुका संघटक तथा संजय गांधी निराधार समितीचे सदस्य नवनाथ काकडे यांच्यासहित धनगर समाजाचे अनेक व्यक्ती उपस्थित होते.