नांदेड(प्रतिनिधी)-आज आपली पोलीस सेवा पुर्ण करून सेवानिवृत्त झालेले पोलीस निरिक्षक-1, पोलीस उपनिरिक्षक-1, ग्रेड पोलीस उपनिरिक्षक-2, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक-8, आणि पोलीस अंमलदार-6 असे एकूण 18 जण सेवानिवृत्त झाल्यानंतर पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्यांचा सहकुटूंब सन्मान करून निरोप दिला.
जिल्हा पोलीस दलात 31 जुलै 2024 ही सेवानिवृत्तीची तारीख असणाऱ्यांपैकी पोलीस निरिक्षक सोनाजी सुर्यभान अंमले-नियंत्रण कक्ष, पोलीस उपनिरिक्षक बस्वराज माणिकराव तपसाळे-पोलीस ठाणे अर्धापूर, श्रेणी पोलीस उपनिरिक्षक बालभारती कैलासबुवा भारती-पोलीस ठाणे मुदखेड, प्रल्हाद नारायण राठोड-पोलीस ठाणे किनवट, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक मारोती लक्ष्मणराव पंते-पोलीस मुख्यालय, कंठीराम धोंडीबा ढेंबरे, दिलीप माधवराव केंद्रे -माळाकोळी, बालाजी विठ्ठलराव वडजे-उमरी, अशोक जळबाजी सुकरे-उस्माननगर, सदाशिव तुकाराम तुरेराव-विमानतळ, दिगंबर खुशालराव जमजाळ-मुखेड, रावसाहेब तुकाराम देशमुख-मनाठा, पोलीस अंमलदार मोहम्मद अलीमोद्दीन मोहम्मद खयुमोद्दीन -धर्माबाद, भगवान पटलबा केंद्रे-माळाकोळी, प्रफुल्ल दिगंबर नागरगोजे-अर्धापूर, भगवान शेकोजी चव्हाण, प्रकाश जीवनाजी गायकवाड, विश्र्वनाथ शामराव खेडकर-पोलीस मुख्यालय नांदेड असे 18 जण सेवानिवृत्त झाले.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व सेवानिवृत्तांना त्यांचा सहकुटूंब सत्कार करून त्यांना निरोप देतांना भविष्यातील जीवनासाठी नियोज लावा अशी सुचना केली. याप्रसंगी प्रभारी पोलीस उपअधिक्षक मुख्यालय जगदीश भंडरवार, पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरिक्षक नामदेव रिठे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहाय्यक पोलसी उपनिरिक्षक विठ्ठल कत्ते यांनी केले. पोलीस कल्याण विभागातील राखी कसबे यांनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.