नांदेड: योजनांचा जागर व नव भारत साक्षरता कार्यक्रम अंर्तगत आज 15 जुलै रोजी पंचायत समितीच्या बैठक सभागृहात सकाळ सत्रात नांदेड उत्तर, अर्धापूर व दुपार सत्रात नांदेड दक्षिण अंतर्गत येणाऱ्या इयत्ता 6 वी ते 12 वीच्या शाळांतील खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनातील मुख्याध्यापक तसेच तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची शिक्षणाधिकारी योजना दिलीपकुमार बनसोडे यांनी बैठक घेतली. विद्यार्थी लाभांच्या योजनाबाबत शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. नव भारत साक्षरता कार्यक्रमाबाबत उपशिक्षणाधिकारी (योजना) माधव शिंगडे यांनी माहिती सांगितली. शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरणे याबाबत शेख रुस्तुम यांनी माहिती दिली. या बैठकीस पंचायत समिती नांदेडचे गटशिक्षणाधिकारी रुस्तुम आडे, शिक्षण विस्तार अधिकारी बालाजीराव शिंदे उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी बालाजी ढगे, मुरली पावडे व शेख रुस्तुम यांनी परिश्रम घेतले. Kanthak Suryatal Post Views: 812 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पत्रकार अजित अंजूम यांच्यावर गुन्हा: खरे बोलले तर शिक्षा; ते म्हणतात मी भिणार नाहीच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत