नांदेड(प्रतिनिधी)-एका गुत्तेदाराला जिवे मारण्याची धमकी देवून त्याचा अपहरण करण्याचा करून 2 कोटींची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुध्द मुखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अंगद उध्दवराव मैलारे या शासकीय गुत्तेदाराने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशांत गंगाधर आलडवार (19) रा.बापशेटवाडी ता.मुखेड, बालाजी व्यंकटराव कदम (30) रा.बिल्लाळी ता.मुखेड, उमाकांत देविदास हिवराळे रा.मेथी ता.मुखेड, योगेश आणि हनमंत रा.उमरसांगवी ता.देगलूर या पाच जणांनी 27 जून रोजी त्यांच्या घरी जाऊन कट रचून जिवे मारण्याची धमकी दिली आणि तडजोड करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली. त्यापुर्वी 26 जुलै रोजी अंगद मैलारे हे मुखेड येथून नांदेडकडे चारचाकी वाहनात जात असतांना त्यांचे अपहरण करण्याच्या उद्देशाने या पाच जणांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. मुखेड पोलीसांनी पाच जणांविरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(3), 308(5), 140(2), 61(2) आणि 62 प्रमाणे गुन्हा क्रमांक 269/2024 दाखल केला आहे. मुखेडचे पोलीस निरिक्षक एल.व्ही.केंद्रे अधिक तपास करीत आहेत.