नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील झाड पडून बालकाच्या झालेल्या मृत्यबद्दल दु:ख व्यक्त करून खा.अशोक चव्हाण यांनी त्या घटनेची जबाबदारी निश्चित करून त्या संबंधीतांवर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रकरणात ज्या दुचाकीवर झाड पडले ती दुचाकी आज तिसऱ्या दिवशी सुध्दा त्याच ठिकाणी पडून आले. म्हणजे प्रशासनाने या घटनेला किती गांभीर्याने घेतले आहे. बहुदा ही बाब खा.अशोक चव्हाण यांना माहित नसावी. मग जी अपघाताची गाडी तिन दिवसांपासून उचली नाही. त्या घटनेची जबाबदारी कोणावर आणि कधी निश्चित होणार आणि त्यावर कार्यवाही कधी होणार हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर खा.अशोक चव्हाण पत्रकारांशी बोत हो. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, मिलिंद देशमुख यांचीही उपस्थिती होती.
नांदेड शहरात 28 जुलै रोजी झाड पडून यश गुप्ता या बालकाच्या मृत्यू प्रकरणी आपल्या संवेदना व्यक्त करतांना खा.चव्हाण म्हणाले की, घटना दुर्देवी आणि गंभीर आहे. या घटनेचा जबाबदार निश्चित करून त्यावर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा आहे.
कोणत्याही प्रकारचा निधी कोणत्याही कारणासाठी वाटप झाल्यानंतर त्यावर सर्व जण समाधानी नसतातच असे डीपीडीसीच्या निधी वाटपाबद्दल बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले.नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदार संघ आणि हिंगोली जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघ अशा 12 विधानसभा मतदार संघाची जबाबदारी मला देण्यात आली आहे आणि त्यासाठी मी वेगवेगळ्या बैठका घेतल्या आहेत. मते जाणून घेतली आहे आणि पुढील निर्णय घेतला जाईल. त्यासाठी योग्य मोर्चे बांधणी फक्त या 12 मतदार संघातच नव्हे तर राज्यभर जोरदारपणे सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले भारत देशाची अर्थ व्यवस्था जगात आज पाचव्या क्रमांकावर आली आहे. केंद्र सरकारने पायाभुत सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे. विविध व्यवसायांसाठी स्टार्टअपवर मोठी गुंतवणूक करून तयारी केली आहे. बदल्या अर्थव्यवस्थेला गरजा पुर्ण करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. सामाजिक कल्याणावर केंद्र सरकारचा सर्वात जास्त भर असून भारतात समृध्दी आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. 1.52 लाख कोटी रुपये कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेचा दर्जा जागतिक व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून 2.52 लाख कोटी रुपये रेल्वेसाठी प्रस्तावित करण्यात आले आहेत. मागील दहा वर्षामध्ये 21 हजार 180 किलो मिटर नवीन रेल्वे रुळ तयार करण्यात आले आहेत. तसेच 41 हजार 655 किलो मिटरच्या रेल्वे रुळांवर विद्युतीकरण करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेश आणि बिहार यांना दिलेल्या निधी बद्दल प्रश्न विचार असता अशोक चव्हाण म्हणाले ी, कोणीही उगीचच समर्थ देणार नाही आणि त्यांनी दिलेल्या समर्थनाच्या तुलनेत त्यांना जास्त निधी मिळाला आहे आणि तो द्यायलाच पाहिजे होता असे अशोक चव्हाणांना वाटते.