नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीसह शेजारच्या तेलंगणा राज्यातून मोटारसायकल चोरणारी टोळी गेल्या अनेक दिवसापासून सर्कीय झाली होती. यामध्ये बिलोली येथील माधव कौठेकर यांची सिप्लेंडर गाडी दि.13 जुलै रोजी अज्ञात चोरट्यांनी रात्री घरून चोरून नेल्याची तक्रारी दिल्यानंतर पोलीसांनी याचा शोध घेतला असता त्यांना मोटारसायकल चोरी करणाऱ्यांची टोळीच हाताला लागली.
बिलोली येथील माधव इरवंत कौठेकर (30) हे नेहमी प्रमाणे आपल्या घरी 15 जुलै रोजी त्यांची मोटारसायकल एम.एच.26 ए.ई.3809 या क्रमांकाची गाडी त्यांनी अंगणात लावली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी ही गाडी चोरून नेली होती. याबाबत त्यांनी दोन दिवस शोधा-शोध करून 15 जुलै रोजी बिलोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर बिलोली पोलीसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला असता त्यांना शुभम यशवंत कांबळे(20) रा.हसनाळ (पदे) ह.मु.देशमुखनगर बिलोली येथून त्याला ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. यानंतर बिलोली पोलीसांनी न्यायालयात हजर केले असता 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कौठडीत त्याने पोलीसांना एम.एच.26 ए.ई.3809 या गाडीबरोबरच अन्य काही गाड्या चोरी केल्या असल्याची कबुली दिली. यामध्ये ए..25ए.एन.1866, एम.एच.26 वाय.6185, एम.एच.26 ए.सी.1953, टी.एस.16एफ ए.5674 या क्रमांकासह अन्य सात ते आठ गाड्या नंबर नसलेल्या गाड्या आपल्या ताब्यात असल्याची सांगितले आणि पोलीसांनी जवळपास शुभम कांबळे या आरोपीकडून जवळपास 12 ते 13 मोटारसायक बिलोली पोलीसांनी हस्तगत केल्या आहेत.