नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीची बैठकीत पालकमंत्री यांनी जिल्हा प्रशासनानाला काही सुचना केल्या आणि आदेशही दिले. पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत तर काही ठिकाणचे पुल वाहुन गेले असून त्याचे काम तातडीने हाती घ्या. नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांसाठी 80 कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती पालकमंत्री गिरीष महाजन यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.
राज्य शासनाच्या कार्यकाळातील ही शेवटची जिल्हा नियोजन समितीची बैठक ठरू शकते. ही बैठक पाच वर्षातील पहिली बैठक ही जम्बो बैठक झाली. या बैठकीला पाच खासदारांसह जवळपास डजनभर आमदार या बैठकीला उपस्थित होते. सुरूवातीला 8 जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुपालनास यावेळी मान्यता देण्यात आली. सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी गेल्या मार्च महिन्यात खर्चाला मान्यता देण्यात आली होती. यात एकूण 659 कोटी जिल्हा वार्षिक योजनेतून विकास कामासाठी तरतूद करण्यात आली होती. यापैकी 99.99 टक्के निधी हा खर्च झाला असल्याचे नमुद करण्यात आले. तर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 749 कोटी रुपयांची तरतुद आजच्या बैठकीत ण्यात आली. यापैकी 229 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
ही बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला खा.अशोक चव्हाण खा.डॉ.अजित गोपछडे, खा.वसंत चव्हाण, खा.नागेश पाटील आष्टीकर, खा.डॉ.शिवाजी काळगे, आ.राम पाटील रातोळीकर, आ.राजेश पवार, आ.बालाजी कल्याणकर, आ.विक्रम काळे, आ.तुषार राठोड, आ.मोहन हंबर्डे, आ.शामसुंदर शिंदे, आ.जितेश अंतापूरकर, आ.भिमराव केराम यांच्यासह सदस्य विश्र्वांभर पवार, जिवन पाटील घोगरे, राजश्री भोसीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आयुक्त डॉ.महेश डोईफोडे, जिल्हानियोजन अधिकारी सुधाकर आडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीत विशेषत: पाणी, आरोग्य, शिक्षण, जलजीवन, कृषी या विषयावर अधिकची चर्चा झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत पालकमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला असता. सभागृहात अधिकारीच उपस्थितीत नव्हते. यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला गांभीर्याने घेण्याच्या सुचना केल्या आहेत. दुसरीकडे राज्य शासनाने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यावर अधिक लक्ष दिले आहे. पण नांदेड जिल्ह्यात मात्र अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसीकर यांना जे अधिकारी, कर्मचारी ऐकत नाहीत. त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करा आणि त्यांच्या जागांवर नवीन कर्मचारी अधिकारी नियुक्त करा अशी तंबीच दिली. याचबरोबर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही पालकमंत्र्यांनी धारेवर धरले होते. तुमच्याकडे ट्रान्सफार्म शिल्लक असतांना नवीन मागणी कशासाठी करत आहात.
याचबरोबर जिल्ह्यातील अनेक प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री महोदयांसमोर विकासात्मक बाबींचा आढावा सादर केला व अनेक ठिकाणी अधिकारी ऐकत नसल्याच्या तक्रारीही केल्या. एकंदरीत ही जिल्हा नियोजन समितीची बैठक पाच खासदार आणि डजनभर आमदारांच्या उपस्थितीत पार पडल्याने नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतच्या इतिहासातील वढी मठी जम्बो बैठक ही एकमेव असल्याचे अनेक सदस्यांनी व्यक्त केल.
तुम्ही साबन लावा जास्त निधी देवू-पालकमंत्री
आ.शामसुंदर शिंदे यांनी तिर्थक्षेत्र माळेगावच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करावी असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पालकमंत्र्यांनी कोणत्या कामासाठी निधी पाहिजे असे म्हणतात आमदारांची बोलती बंद झाली आणि यावेळी आ.शिंदे यांनी काळ्या आमदाराला अन गोऱ्या आमदाराला जास्त निधी असा मुद्दा उपस्थित करताच पालकमंत्र्यांनी तुम्ही साबन लावून गोरे व्हा तुम्हालाही निधी जास्त देवू.